मांड्याना, काखेत, खाज, खरुज, गजकर्ण, नायटा त्वचा रोगांवर घरगुती उपाय

आपल्याला मांड्याना, काखेत सगळ्यात जास्त घाम येत असतो; कामावरून आल्यानंतर आपण हात पाय चेहरा धुतो. मात्र ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त घाम येतो त्याठिकाणी घामामुळे खाज, खरुज, गजकर्ण, नायटा असे त्वचा रोग होण्याचा धोका सगळ्यात जास्त असतो.

आपल्या मांड्यांना आणि काखेत खाज, खरुज, गजकर्ण, नायटा झाले असल्यास नेमके कोणकोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात याची माहिती आज आपण घेणार आहोत.

आपल्या काखेत खाज येत असल्यास आपण सुती कपडे वापरले पाहिजेत सुती कपडे आपल्याला येणारा घाम चांगल्याप्रकारे शोषून घेतात. कामावरून आल्यानंतर कोमट पाण्यात अँटीसेप्टिक लिक्विड टाकून मग त्या पाण्याने अंघोळ करा.

खाज येणे, नायटा येणे हे संसर्गजन्य आजार असल्याने आपले कपडे वेगळे धुवा. जेणेकरून आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांना हा आजार होणार नाही. अंघोळ करण्यासाठी आपण जो साबण वापरता तो शक्यतो कमी केमिकल युक्त वापरा.

काखेत खाज येत असल्यास कामावरून आल्यानंतर अंघोळ केल्यानंतर तो भाग चांगला कोरडा करून त्यावर हलक्या हाताने नारळाचे तेल लावा. नारळाचे तेल काही दिवस लावल्याने काखेत येणारी खाज बंद होईल.

आपल्या काखेत, मांड्याना नायटा झाला असल्यास 1 चमचा गायीच्या शुद्ध तुपामध्ये थोडीशी हळद पावडर मिसळून ते त्याजागेवर लावा. साधारण 10-12 दिवस हा उपाय केल्याने आपल्याला आराम वाटेल.

आपल्या मांड्याना, काखेत खाज, खरुज, गजकर्ण, नायटा झाला असल्यास हा सोपा उपाय आपण करू शकता. यासाठी एका वाटीत तुरटीचा बारीक खडा घेऊन त्याची पावडर तयार करून घ्या. तुरटीमध्ये अँटीबॅक्टरियल घटक मोठ्या प्रमाणात असतात. त्यानंतर 1 चमचा हळद घ्या.

हळद जखमेवर लावल्याने जखम लवकर भरून येते. त्यानंतर 1 चमचा नारळाचे तेल त्यामध्ये मिसळा. नारळाच्या तेलामुळे त्वचा मुलायम होते. त्यानंतर हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.

हे मिश्रण चांगले एकजीव केल्यावर आपल्या मांड्याना, काखेत हलक्या हाताने ते लावा. रात्रभर राहूद्या नंतर सकाळी कोमट पाण्याने धुऊन टाका. साधारणपणे आठवड्यातून 3 वेळा हा उपाय केल्याने आपल्याला मांड्याना, काखेत असणारे खाज, खरुज, गजकर्ण, नायटा यासारखे सगळे त्वचा रोग नाहीशे होतील.

आपल्या घरातील लहान मुलांच्या मांड्याना किंवा अवघड जागी खाज येत असेल तर त्यामागचे मुख्य कारण लहान मुल  आपल्या निकरमध्ये लघवी करत असतात. लघवी केल्यानंतर निकर लगेच न बदल्याने, त्यांच्यासाठी आपण जे तसेच पावडर,तेल वापरता त्यामुळे सुद्धा खाज येऊ शकते.

लहान मुलांच्या मांड्याना किंवा अवघड जागी खाज येऊ नये यासाठी आपण त्यांच्या निकर वेळच्या वेळी बदला तसेच त्या धुताना इतर कपड्यांसोबत न धुता वेगळया धुवा तसेच लहान मुलांच्या निकर धुताना चांगल्या प्रतीचे अँटीसेप्टिक लिक्विड पाण्यात मिसळून मग धुवा. त्याच बरोबर लहान मुलांसाठी आपण जे कपडे निवडता ते कॉटनचे म्हणजेच सुती कपडे निवडा.

आपल्याला मांड्याना, काखेत, खाज, खरुज, गजकर्ण, नायटा त्वचा रोगांवर घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page