mandukhi kami karnyasathi upay

मानदुखी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

Mahtvache

सतत संगणकावर काम केल्यामुळे आपल्याला मान दुखीचा त्रास होऊ शकतो. झोपण्याच्या चुकीच्या सवयीमुळेही  मान दुखीचा त्रास होऊ शकतो. एकाच जागी बसून काम केल्याने हि मान दुखीचा त्रास होऊ शकतो.

याच बरोबर खाली वाकून मोबाईल मध्ये जास्त वेळ बघण्यामुळे हि मान दुखी होऊ शकते. अशावेळी तुम्ही काही घरगुती उपाय करून तुमची मानदुखी सहज कमी करू शकता. चला तर मग पाहूया मानदुखी कमी करण्याचे घरगुती उपाय.

मानदुखीवर त्वरित आराम मिळवायचा असेल तर तुम्ही त्यावर बर्फ लावू शकता. यासाठी ज्या ठिकाणी दुखत आहे त्या ठिकाणी हळुवारपणे बर्फाने चोळा. असे केल्याने तुम्हाला लगेच आराम मिळेल. बर्फ कितीही थंड असला तरी तो उष्ण असतो. त्यामुळे बर्फ मानेवर ठेवल्यास तुम्हाला त्वरित आराम मिळतो.

झोपताना विशेष काळजी घ्यावी. मऊ उशी घेऊन झोपा. त्यामुळे तुमची मान नेहमीपेक्षा थोडीशी वाकून तिला विश्रांती मिळेल. मऊ आणि कमी उंचीची उशी वापरल्यामुळे मेंदूमध्ये योग्यप्रकारे रक्त पुरवठा होईल. तसेच तुम्हाला कधी मानेचा त्रास होणार नाही.

खोबरेल तेल अथवा कोणतेही औषधी तेल याने हळुवार हाताने मालिश करा. त्यामुळे तुम्हाला आराम वाटेल. मालिश करताना विशेष काळजी घ्या. जोरात मालिश न करता हळुवार हाताने मालिश करणे जास्त फायदेशीर आहे.

सकाळच्या शुद्ध वातावरणामध्ये योगासने केल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. योगासन केल्यामुळे स्नायू बळकट होतात. याचा परिणाम असा होतो की मान दुखी, कंबर दुखी, पाठ दुखी असे कोणतेही आजार तुम्हाला होत नाहीत. मान दुखीचा त्रास टाळण्यासाठी तुम्ही नियमित 15 ते 20 मिनिटे योगासने करू शकता.

आपल्याला मानदुखी कमी करण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *