मानदुखीवर प्रभावी घरगुती उपाय

सतत संगणकावर काम केल्यामुळे आपल्याला मान दुखीचा त्रास होऊ शकतो. झोपण्याच्या चुकीच्या सवयीमुळेही मान दुखीचा त्रास होऊ शकतो.  एकाच जागी बसून काम केल्याने हि मान दुखीचा त्रास होऊ शकतो. याच बरोबर खाली वाकून मोबाईल मध्ये जास्त वेळ बघण्यामुळे हि मान दुखी होऊ शकते.

अशावेळी तुम्ही काही घरगुती उपाय करून तुमची मानदुखी सहज कमी करू शकता. चला तर मग पाहूया मानदुखी कमी करण्याचे घरगुती उपाय. मानदुखीवर त्वरित आराम मिळवायचा असेल तर तुम्ही त्यावर बर्फ लावू शकता.

यासाठी ज्या ठिकाणी दुखत आहे त्या ठिकाणी हळुवारपणे बर्फाने चोळा. असे केल्याने तुम्हाला लगेच आराम मिळेल. बर्फ कितीही थंड असला तरी तो उष्ण असतो. त्यामुळे बर्फ मानेवर ठेवल्यास तुम्हाला त्वरित आराम मिळतो.

झोपताना विशेष काळजी घ्यावी. मऊ उशी घेऊन झोपा. त्यामुळे तुमची मान नेहमीपेक्षा थोडीशी वाकून तिला विश्रांती मिळेल. मऊ आणि कमी उंचीची उशी वापरल्यामुळे मेंदूमध्ये योग्यप्रकारे रक्त पुरवठा होईल. तसेच तुम्हाला कधी मानेचा त्रास होणार नाही.

मान दुखत असल्यावर मालिश केल्याने देखील आराम मिळू शकतो यासाठी मोहरीचे तेल कोमट करून घ्या त्यानंतर हळुवार हाताने आपल्या मानेची मालिश करा. असे केल्याने तुम्हाला आराम वाटेल. मालिश करताना विशेष काळजी घ्या. जोरात मालिश न करता हळुवार हाताने मालिश करा.

ऍपल सायडर व्हिनेगरमध्ये दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात जे वेदना किंवा जळजळ कमी करण्यास मदत करतात. आपली मान दुखत असेल तेव्हा सुती कपड्यावर किंवा रुमालावर थोडेसे ऍपल सायडर व्हिनेगर घ्या. त्यानंतर तो रुमाल मानेवर ठेवा. 30 मिनिटे राहूद्या असे केल्याने आपल्या वेदना कमी होऊन आराम मिळेल.

सकाळच्या शुद्ध वातावरणामध्ये योगासन केल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. योगासन केल्यामुळे स्नायू बळकट होतात. याचा परिणाम असा होतो की मान दुखी, कंबर दुखी, पाठ दुखी असे कोणतेही आजार आपल्याला  होणार नाही. मान दुखीचा त्रास टाळण्यासाठी आपण नियमित 15 ते 20 मिनिटे योगा करू शकता.

आपल्याला मानदुखीवर प्रभावी घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा; अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page