manachi ekagrata vadhva

मनाची एकाग्रता वाढवण्यासाठीचे साधे सोप्पे उपाय

Mahtvache

सध्या महाराष्ट्रावर आणि देशावर जी परिस्थिती आली आहे. नाही म्हटलं तरी प्रत्येक जण या वायरस मुळे घाबरला आहे. त्यात सरकारने घरी थांबण्याचे सक्त आदेश दिले आहेत. घरात बसून बसून अर्थातच मनाची एकाग्रता कमी होते. राग चिडचिडेपणा वाढायला लागतो, नैराश्य आल्यासारखं वाटू लागतं. म्हणून आज आपण मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी काही सोप्पे उपाय करता येईल का ते पाहुयात.

तुम्ही कितीही प्रतिभावान किंवा तुमच्या क्षेत्रातील तज्ञ-दिग्गज असला तरीही आयुष्यात तितकंसं साधं सोपं नसतं. त्यातही बरेच चढ उतार असतात. आपल्या आयुष्यात कधी अपेक्षित तर कधी अनपेक्षितपणे अशी काही आव्हाने येतात की मन एकाग्र करणे थोडं जिकरीचे बनते.

मनाची अशी अवस्था कधीकधी काही दिवस, काही महिने किंवा काही वर्षेसुध्दा टिकते. तसेच आजच्या काळातील सतत आणि कायम असणारी स्पर्धा त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मनावर प्रचंड ताण हा मनाच्या एकाग्रतेच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो.

अनेक अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की ध्यानधारणा करण्याचा नियमित सराव केल्याने आपलं मन शांत होऊन लक्ष वाढविण्यास आणि टिकवून ठेवण्यास मदत होते. ध्यान केल्याने आपण जास्त विचार करत नाही आहे त्या आव्हानाला आपण सामोरे जातो. ध्यान आपल्याला फक्त एकाग्रता वाढविण्यासच नाही तर एकाग्रतेची शक्ती किंवा क्षमता वाढविण्यास मदत करते.

ध्यान करणं ज्यांना शक्य नसेल त्यांनी डोळे बंद करून आपल्या श्वास किती वेळा घेतला किती वेळा सोडला हे मोजा. किंवा कालच्या दिवस भरात आपण काय काय केलं ते आठवण्याचा प्रयत्न करा. आपल्या घरा पासून ऑफिस किंवा शाळा कॉलेज ला जाणारा रस्ता आठवा त्या रस्त्याने रोज आपल्याला किती वेळ लागतो तेवढा वेळ तो रस्ता आठवा.

कोणतेही महत्त्वाचे काम करताना किंवा अभ्यास करताना शक्यतो शांत ठिकाणाची निवड करा. गाजबलेली जागा, आवाज गोंगाट, टीव्ही जागेची निवड करू नये, कारण यामुळे लक्ष जास्त विचलीत होते.

हळू हळू एकेक काम करा. एकत्र किंवा एकाचवेळी दोन कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न शक्यतो करू नका. यामुळे दोन्ही कामे बिघडण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी एकही काम एकाग्रतेने होऊ शकत नाही म्हणून एका वेळी एकच काम.

प्रत्येक कामाचे किंवा अभ्यासाचे प्राधान्य ठरवून घ्यावे. अभ्यास किंवा कोणतेही महत्त्वाचे काम करण्यासाठी सकाळची वेळ सर्वांत चांगली असते. तसेच सकाळच्या वेळी मेंदूची कार्यक्षमता अधिक चांगली असते. त्यामुळे सकाळी महत्वाची कामं किंवा महत्वाचा अभ्यास उरकून घेऊ शकता.

मेंदूची कार्यक्षमता मजबूत करण्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. त्यामुळे भरपूर झोपावे. विचारांवर योग्य नियंत्रण नसल्यासदेखील वारंवार लक्ष विचलीत होते. त्यामुळे शक्य होईल तेंव्हा सतत येणारे विचार बंद कसे होतील यावर लक्ष द्या. मानसिकदृष्ट्या निराश असणे किंवा वैचारिक गोंधळ होत असल्यामुळेही असे होते. त्यावर नियंत्रण मिळवा शांत वाटेल अस संगीत ऐका.

स्वतःला वेळ द्या स्वतःला असं काय आहे जे केल्यावर शांत वाटतं. ते काम करा. आपल्याला हवं ते यश वस्तू किंवा आनंद मिळवलंय, ध्येय साध्य केलंय याची दृश्यकल्पना करा (व्हिज्युलाइजेशन). ते करत असताना त्याची वातावरण निर्मिती करा. कपडे वेळ चेहऱ्यावरील आपल्या भावना आपल्या साठी समोरच्या चेहऱ्यावर असलेल्या भावना बघा काय येतात.

आपल्याला आवडणारा चित्रपट किती लक्षात आहे ते आठवा, लहान पणी घडलेले किस्से जसेच्या तसे आठवतात का ते आठवून बघा. प्रेमात पडला असाल तर कसे पडलात. आणि नसाल तर एखाद्या मुलीला किंवा मुलाला प्रेमाची मागणी कशी घालाल ते विचार करा. त्याने मन हलकं होईल मनाचा ताण कुठच्या कुठे निघून जाईल. आयुष्य खूप सुंदर आणि सकारात्मक आहे मला जे हवं ते मी मिळणारच हा आत्मविश्वास स्वतःला द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *