पुणे म्हटले की डोळ्यांसमोर गणेशोत्सव येतो. पुण्यातील गणेशोत्सव जगातील सर्वात मोठा उत्सव आहे. पुण्यातील गणेशोस्तवात आकर्षण असते ते मानाच्या पाच गणपतींचे आणि ढोल ताशांचे.
फक्त महाराष्ट्रातुनच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील वेगवेगळ्या भागातून अनेक गणेशभक्त पुण्याचा गणेशोत्सव पाहण्यासाठी येत असतात. याच बाप्पांच्या पुण्यातील मानाच्या पहिल्या गणपतीची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई साहेब राजमाता जिजाऊ यांनी केली.
हा काळ होता साधारणतः 1640 ते 1642 चा. महाराजांचे वडील म्हणजे शहाजीराजे यांनी बंगळुरूहुन राजमाता जिजाऊ आणि बाल शिवराय यांना पुण्यात पाठवले. राजमाता जिजाऊ पुण्यात आल्या आणि त्यांनी स्वराज्याचा श्रीगणेशा केला तो या गणेश मंदिराची उभारणी करून.
हे मंदिर आज पुण्याची ग्रामदेवता म्हणून ओळखले जाते. म्हणूनच पुण्यातील गणेशोत्सवात मानाच्या पहिल्या गणपतीचा मान कसबा गणपती मंदिराला आहे. गणेश विसर्जनावेळी सर्वात आधी मानाच्या पाच गणपतींचे रथ सर्वात आधी निघतात, त्यानंतर इतर गणपतीचे रथ निघतात.
या मंदिरामधील मूर्तीचे खास वैशिष्ट्य म्हणजे दगडी खांबांच्या गाभाऱ्यात असलेली ही मूर्ती तांदळा स्वरूपाची आहे. तांदळा याचा अर्थ असा आहे की हात-पाय वगैरे अवयव नसणारी, मुखवटा वजा मूर्ती. शेंदूर लावलेल्या या मूर्तीची दररोज पूजा केली जाते.
मुख्य शहरांमध्ये शनिवार वाड्यापासून अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावर असणारे हे मंदिर अतिशय सुंदर आहे. बाहेरून विटांचे बांधकाम केले असून आत प्रवेश केल्यानंतर लाकडी बांधकामाने हे मंदिर सजविण्यात आले आहे.
मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर वाड्यात आल्यासारखे वाटते. पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरांमध्ये असलेल्या या मंदिरात गेल्यानंतर शांततेचा अनुभव येतो.
आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.
आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा. महत्वाची टीप: हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.