आजकाल तरुणांमध्ये मान दुखीची समस्या झपाट्याने वाढत आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे, जास्त वेळ एकाच जागेवर बसून काम असल्याने, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर काम करताना मानेचे स्नायू ताणले जातात.
आणि मान दुखीची समस्या सुरु होते. मान दुखत असेल तर झोपणे, उठणे आणि बसणेही कठीण होऊन जात; म्हणूनच मान दुखत असल्यावर नेमके कोणते उपाय करायचे हे आज आपण जाणून घेणार आहोत.
मान दुखत असल्यावर गरम पाणी प्लास्टिकच्या पिशवीत भरून वेदना होत असलेल्या जागी शेकवा. जर आपल्या घरी लाल रंगाची रबरी पिशवी असेल तर त्यामध्ये पाणी भरून शेकवले तरी चालेल. गरम पाण्याने शेकवल्याने वेदना कमी होऊन आराम मिळतो.
सकाळी थोडेसे आले मधात मिसळून सेवन केल्याने वेदना कमी व्हायला मदत होते. मान दुखीच्या वेदना कमी होण्यासाठी आंघोळ करताना पाण्यात थोडेसे सैंधव मीठ टाकुन त्या पाण्याने आंघोळ करा.
सैंधव मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे स्नायु मोकळे होऊन वेदना कमी होतात. मान दुखीच्या वेदना कमी होण्यासाठी बर्फाने शेकवले तरी चालू शकत. बर्फाने अंग शेकवल्याने देखील वेदना कमी होतात.
मान दुखीचा त्रास होऊ नये यासाठी आपल काम एकाच जागेवर जास्त वेळ बसून असेल तर साधारण 30 मिनिटांनी जागेवर उठा आकाशाकडे बघा, आजू बाजूला बघा अशा प्रकारे स्ट्रेचिंग करुन मग काम सुरु करा. असे केल्याने मानेवर आलेला ताण कमी होईल. शक्यतो मोबाइल फोनचा जास्त वापर करू नका.
आपल्याला मान दुखीच्या वेदना कमी होण्यासाठी प्रभावी ईलाज हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत. आपल्या कमेंटस आम्ही वाचत असतो त्यामुळे कमेंट नक्की करा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.