छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांनी मालोजीराजे यांनी जीर्णोद्धार केलेल्या शिवमंदिराचा इतिहास

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग म्हणजे  घृष्णेश्वर मंदिर. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबादपासून अवघ्या 11 किलोमीटरच्या अंतरावर वेरूळच्या लेण्यांजवळ हे मंदिर असून या मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी केला. याचा उल्लेख या मंदिरात असलेल्या एका शिलालेखावरून कळतो.

वास्तुरचनेचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर संपूर्ण दगडांमध्ये बांधले असून वरील बांधकाम विटा आणि चुन्याने केलेले आहे. एकूण 56 दगडी पायऱ्या असलेले हे मंदिर विविध कलापूर्ण मूर्त्यांनी सजवले आहे. या मंदिरामध्ये अनेक पुराणकथा कोरलेल्या दिसतात.

यामध्ये शिवपार्वती विवाह, गणेश कथा, ब्रम्हा, विष्णू अशा अनेक कथा कोरलेल्या दिसतात. अहिल्याबाई होळकर यांनी पुन्हा एकदा या मंदिराचा जीर्णोद्धार केला. या मंदिराला घृष्णेश्वर हे नाव पडण्यामागे एक कथा सांगितली जाते. ती अशी की, घृष्णा ही शिवाची भक्त होती. शंकराच्या उपासनेमध्ये आणि पूजेमध्ये ती तल्लीन होत होती.

शिवाने अशिर्वाद देताच तिला पुत्र झाला. मात्र घृष्णाची बहीण सुदेही ही तिची सवत ही होती. दोघींना मुलबाळ होत नव्हते. परंतु शिवाच्या आशीर्वादाने घृष्णाला पुत्रप्राप्ती झाली. या मत्सराने सुदेहाने घृष्णाच्या मुलाचा वध केला.

शिवपूजेत तल्लीन असलेल्या घृष्णाला ही वार्ता कळताच ती डगमगली नाही. तिने पूजा संपूर्ण केली. शिवाची मनोभावे पूजा केल्याने पुन्हा महादेव प्रसन्न झाले आणि घृष्णाचा पुत्र पुन्हा जिवंत झाला. याठिकाणी शंकराने कायमचे वास्तव्य करावे. या मागणीने शिव स्थायिक झाले आणि घृष्णेच्या शिवभक्तीने या ठिकाणास “घृष्णेश्वर” हे नाव प्राप्त झाले.

सुंदर शिल्पकलेने नटलेले हे मंदिर पाण्यासाठी नक्की जा. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्याला अजून कोणत्या विषयावरील माहिती वाचायला आवडेल हे नक्की सांगा.

Leave a Comment

You cannot copy content of this page