निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारात खनिजे, विटामिन आणि पोषकतत्व असलेले अन्नपदार्थ असणे गरजेच असत. आपल्या शरीरामध्ये एखाद्या पोषक घटकाचे प्रमाण कमी झाले तर त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते.
विटामिन डी च्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात, पक्षाघात, मधुमेह, उच्च रक्तदाबाचे आजार होण्याची शक्यता असते. आज आपण आपल्या शरीरात विटामिन डी ची कमतरता असल्यास कोणकोणती लक्षणे दिसू शकतात हे जाणून घेणार आहोत.
दिवसभर थकवा जाणवणे हे विटामिन डी च्या कमतरतेचे मुख्य लक्षण आहे. पुरेशी झोप घेतल्यानंतरही जर आपल्याला थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल तर हे विटामिन डीच्या कमतरतेचे लक्षण असू शकते.
पाठदुखी हे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे लक्षण आहे. कॅल्शियममुळे हाडे आणि दात मजबूत होतात, परंतु व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कॅल्शियम शरीरात शोषले जात नाही. आणि हाडे आणि दात कमकुवत होतात. शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास जखमा लवकर बऱ्या होत नाहीत.
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आपले केस गळू लागतात. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होते. आता आपण शरीरातील विटामिन डी ची कमतरता दूर करण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेऊयात.
व्हिटॅमिन डीचा सर्वात मोठा स्त्रोत सूर्यप्रकाश आहे. यामुळेच व्हिटॅमिन डीला सनशाईन व्हिटॅमिन असेही म्हणतात. सकाळी कोवळ्या उन्हात चालल्याने आपल्या शरीराला आवश्यक असणारे विटामिन डी मिळू शकते.
अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये व्हिटॅमिन डी असते. व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी आपण अंड्याचे सेवन करू शकता. गाईचे दूध हे व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. आपल्या शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी आपण रोज एक ग्लास गाईचे दूध पिऊ शकता.
आपल्या आहारात ताजी फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केल्याने देखील आपल्याला आवश्यक पोषक घटक मिळू शकतात. हि माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहचवण्यासाठी आम्हाला मदत करा, आपल्या मैत्रीणींना कमेंटमध्ये टॅग करा.
आपल्याला महिलांमध्ये विटामिन डी कमतरता असण्याची लक्षणे आणि विटामिन डी वाढण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा; अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.