महिलांनी गरोदर असताना आपल्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे?

गरोदर महिलांना आपल्या आहाराची काळजी घेणे बाळाच्या विकासासाठी गरजेच असत. गरोदर असताना ज्या प्रकारचा आहार आपण घेता त्यानुसारच बाळाचे पोषण होत असते.

बाळाचे पोषण योग्यप्रकारे होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. गरोदर असताना विटामिन, प्रथिने, फायबर, लोह, कॅल्शियम असे पोषक घटक असणारे पदार्थ आपल्या आहारात असणे गरजेच असत.

गरोदर महिलांनी स्वतःला हायड्रेट ठेवणे गरजेच असत. आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी शक्य तितके पाणी प्या. यासोबतच नारळाचे पाणी आपण पिवू शकता.

दररोज सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात बसून किंवा कोवळ्या उन्हात चालण्याने व्हिटॅमिन डी नैसर्गिकरित्या मिळते.  व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरातील कॅल्शियमचे पचन करण्यास मदत करते.

गरोदरपणात महिलांना कॅल्शियमची खूप गरज असते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थातून कॅल्शियम मिळू शकते. याशिवाय पालक, मेथी, आवळा, गाजर आणि सोयाबीन यामध्ये सुद्धा मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते.

गर्भधारणेदरम्यान स्त्रियांना 40 मिलीग्राम लोह आवश्यक असते. लोहाची गरज पूर्ण करण्यासाठी ताजी फळे, अंकुरित कडधान्ये, तृणधान्ये, गूळ, अंजीर, खजूर, बदाम, काळे मनुके अशा ड्रायफ्रुटसचा आहारात समावेश करा.

याशिवाय रोजच्या आहारातून पुरेशे फायबर घटक मिळण्यासाठी गाजर, बीट, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश आहारात असुद्या. ग’र्भधारणे दरम्यान महिलांनी संत्री, मोसंबी, कलिंगड, टरबूज, केळी, चिकू, सफरचंद अशा फळांचा आहारात समावेश करावा. या फळांमध्ये विटामिन आणि एन्टीऑक्सीडेन्ट, खनिजे मोठ्या प्रमाणात असतात.

आपल्याला हाडे निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याची माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. कोणतीही गोष्ट करण्याआधी आपल्या फॅमिली डॉ चा सल्ला अवश्य घ्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page