महिलांमधील रक्ताची कमतरता कारणे आणि घरगुती उपाय

रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात. ही समस्या पुरुषांच्या पेक्षा महिलांमध्ये जास्त असते. ज्यांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते ते  एनिमिया या आजाराचे शिकार होतात.  आज आपण जाणून घेणार आहोत आहारामध्ये कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव केल्याने रक्तात वाढ होऊ शकते.

रक्तवाढीसाठी आपल्या आहारात पालकचा समावेश करा पालक मध्ये विटामिन ए, सी, बी आयर्न, फाइबर आणि कैल्शियम अधिक प्रमाणात असते.  आहारात पालकचा समावेश केल्याने शरीरात रक्ताचे प्रमाण भरपूर वाढेल. गुळा सोबत शेंगदाणे खाल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत मिळेल.

शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी दुध आणि खजूर खाणे हा सर्वात सोपा आणि उत्तम उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी रात्री झोपण्याच्या काही वेळ अगोदर दुधामध्ये खजूर भिजायला टाकावे 30 मिनिटांनी  दुध प्यावे. दुध प्यायल्या नंतर खजूर खावे.

रक्तवाढीसाठी मुठभर तीळ 2 तास पाण्यात भिजत ठेवा. पाणी गाळून तिळाची पेस्ट बनवा. यामध्ये 1 चमचा मध टाका आणि दिवसातून दोन वेळा हे खा. असे केल्याने रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत मिळेल.

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात डाळिंबाचा समावेश करा डाळिंबामध्ये लोह आणि कॅल्शियमसोबत प्रथिन, आणि फायबर असतात. यामुळे शरीरात रक्ताचे प्रमाण वाढायला मदत होते. शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्या आहारात बीट समावेश करा. असे केल्याने रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत मिळेल.

रक्तवाढीसाठी आपल्या आहारात खजूराचा समावेश करा. खजूराध्ये लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. खजूराचे सेवन केल्याने रक्त वाढण्यास मदत मिळेल. आपल्याला महिलांमधील रक्ताची कमतरता कारणे आणि घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page