महादेवाची उपासना करणारा इंग्रज अधिकारी

हिंदू धर्म चमत्कार होतात अश्या गोष्टी प्रख्यात आहे; मानववतार म्हणून जन्मलेल्या देवतांच्या अलौकिक कृत्यांविषयी अनेक कथा हिंदू धर्मात प्रसिद्ध आहेत. आपल्या पैकी बरेच जण असं सांगताना दिसतात की देवाने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला. तर एखादी देवता दिसते. पण याला काही लोक अंधश्रद्धा अस म्हणू शकतात परंतु हा ज्याचा त्याचा श्रद्धेचा विषय आहे.

पण एका दुसऱ्या धर्मातील एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या धर्मातील एका व्यक्तीचे  जीवन वाचवणारे देव या बाबतीत एखादी कथा ऐकली आहे आहे का? वाचायला थोडं विचित्र वाटेल पण शुद्ध अंतकरणापासून जर आपल्या आसपास असणाऱ्या सकारात्मक ऊर्जेला आवाहन केलं की ती शक्ती नक्कीच आपल्याला मदत करेल.

१८७९ चा काळ होता, भारतात ब्रिटिशांचे राज्य होते. ब्रिटिश अधिकारी कर्नल मार्टिन त्यावेळी अफगाणभूमीवर पठाणांविरुद्ध आपल्या सैन्याची एक तुकडी घेऊन युद्ध लढत होता. मार्टिन नेहमी त्याच्या पत्नीला आपली खुशाली कळवत असे तशी खुशाली ते पत्राद्वारे सांगत असे.

पण युद्ध अपेक्षित कालावधी पेक्षा जास्त दिवस चालले त्यात शत्रूने कोंडीत पकडल्याने बाहेर चा संपूर्णच संपर्क तुटला. त्यामुळे त्यांना त्याच्या पत्नीला पत्र ही पाठवता येत नव्हतं. पतीची खुशाली न कळल्याने मार्टिन यांच्या पत्नीला काळजी वाटू लागली. ‘आपल्या पतीचे काही बरेवाईट तर झाले नाही ना’ या विचाराने ती अस्वस्थ राहू लागली.

कर्नल मार्टिन यांच्या पत्नी ना पतीची बरीच काळजी वाटत होती. बैजनाथ मंदिराच्या आवारापासून जाताना ती एकदा मंत्रोच्चारांचा आणि घंट्यांचा आवाज ऐकते व मंदिरात प्रवेश करते. तिथे उपस्थित पुजारी जेव्हा तिला तिच्या चिंतेचे कारण विचारतात तेव्हा ती त्यांना सर्व काही सांगते.

पुजारी तिला सांगतात की हे महादेवाचे मंदिर आहे इथे जो कोणी महादेवाची मनोभावे पूजा करतो त्याच्या चिंतेचे हरण नेहमीच होते. पुजारिजींचे बोल ऐकून मार्टिनची पत्नी महादेवाची पूजा करायचे ठरवते व पूजेचे सर्व विधी समजावून घेत १४  दिवस मनोभावे पूजा केली. १४व्या दिवशी युद्धभूमीवरून एक सैनिक मार्टिनचे पत्र घेऊन तिच्यापाशी येतो. त्यात लिहिलेले असते.

मी तुला नेहमीच पत्र पाठवीत असे पण काही दिवसांपूर्वी आम्हाला पठाणांनी सगळ्या बाजूनी घेरले. आम्ही इतक्या वाईट तऱ्हेने अडकलो होतो की तेथून बाहेर पडण्याची आम्हाला कुठलीही आशा राहीली नव्हती. तेवढ्यात मी तिथे एक भारतीय योगी पाहिला, त्याने वाघाची कातडी लपेटली होती, त्याचे लांब केस होते आणि त्याच्या हातात एक तीन धारदार टोक असलेले शस्त्र होते.

जेवढे त्याचे व्यक्तिमत्व भारदस्त होते तेवढेच त्याचे शस्त्र चालवण्याचे कसबही. त्याचे अफाट शक्तिप्रदर्शन पाहून सर्व पठाण पळून जातात. ज्या ठिकाणी आम्ही जवळ जवळ हरल्यात जमा होतो, तिथेच आम्ही आश्चर्यकारकरित्या जिंकलो.

जेव्हा मार्टिनची पत्नी त्याला तिने केलेल्या पूजेची सगळी हकीकत सांगते, तेव्हा ते दोघेही अचंबित होतात. त्यानंतर काही दिवसांनीच मार्टिन युद्ध  भूमीवरून आल्याने. कर्नल मार्टिन आणि त्याची पत्नी जोडीने बैजनाथच्या मंदिरात जाऊन महादेवाची मनोभावे पूजा केली व मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु केलं.

त्यानंतर दोघेही आजन्म महादेवाचे भक्त बनले. आजही आपण मालवा, मध्य प्रदेश येथील बैजनाथ महादेवाचे मंदिर असे एकमेव मंदिर आहे की ज्या मंदिराचा जीर्णोद्धार ब्रिटिशांनी केला आहे. ह्या ब्रिटिश जोडीचे नाव तुम्हाला आजही मंदिराच्या आवारात कोरलेले दिसून येईल.

Leave a Comment

You cannot copy content of this page