दिल्लीसह ब्रिटिशांना टाचे खाली आणणारा एक मराठा योद्धा

१७६१ रोजी पानिपत येथे झालेल्या युद्धात भयानक नरसंहार झाला होता, विश्वासराव यांच्या हत्येमुळे युद्धाचे स्वरूप बदलले आणि मराठ्यांचा पराभव झाला. या युद्धात २५ ते ३० वर्षांचे लाखो मराठा तरुण मृत्युमुखी पडले.

युद्धाची ही भीषणता एका तिशीच्या तरुणाने फार जवळून पाहिली उरलेल्या आपल्या भरावश्याच्या मराठयांना घेऊन या पराभवाचा बदला घेण्याचा घ्यायचं ठरवलं. आपल्या उरलेल्या सैन्यासह परत आपल्या राज्यात परत आले. कधी कधी वाघ सुद्धा दोन पावलं मागे येतो मोठी झेप घेण्यासाठी आज आपण अश्याच वाघाचं काळीज असणारा वीर मराठा योध्याबद्दल.

पानिपतची लढाई मराठा साम्राज्यासाठी काळ्या रात्रीसारखी होती, ज्या काळ्या रात्रीने नानासाहेब पेशवे, सदाशिवभाऊ आणि विश्वासराव यांच्या सह अनेक मातब्बर स्वराज्यनिष्ठ मराठे गिळंकृत केले. त्याचबरोबर रघुनाथरावांचे राजकारणाचे खेळ सुरू झाले. पण माधवराव पेशवे, महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांनी काळोखात गेलेलं मराठा साम्राज्य एक नवा अध्याय सुरू केला. या तीनही जणांनी मिळून मराठा साम्राज्याला सोन्याची उंची दिली होती.

पानिपतच्या युद्धापर्यंत शिंदे घराण्याचे प्रमुख जाणकोजी शिंदे हे लढत राहिले. पानिपत युद्धाच्या ६ वर्षानंतर महादजी शिंदे ग्वालेरच्या घराण्याचे प्रमुख झाले. पानिपत युद्धानंतर उत्तर भारतात अक्षरशः अशांततेचं केंद्रच बनला होता.

प्लासी युद्धाच्या विजयानंतर ब्रिटिशांना दिल्लीवर सत्ता गाजवायची होती. त्यांनी १७६४ साली झालेल्या बक्सर च्या युद्धा नंतर असेच केले आणि मुघल बादशहाला गुलाम केले. पण इंग्रजांना मात्र दिल्ली ताब्यात घेण्यासाठी बराच काळ जाणार होता.

प्लासी ते दिल्ली पर्यंत पोहोचण्यासाठी ब्रिटिशांना ग्वाल्हेर मधून जावे लागणार होतं. आणि ग्वाल्हेरला महादजी शिंदे यांचा अंमल असून ते ब्रिटिशांना पुरते ओळखून होते. १७७१ साली महादजी शिंदे यांनी मुघलांना मराठ्यांच्या टाचे खाली आणलं.

इतकं की दिल्लीतील साधं पान सुद्धा मराठ्यांच्या मर्जीने हलु शकत नव्हतं. अगदी मुघल बादशहादेखील नाही. पानीपतमध्ये ज्याने नजीब व रोहिलो यांनी हिंदु स्वराज्याविरूद्ध डोके उंचावले होते, महादजींनी ते झुकवलं होतं. महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्य शिगेला होते.

जानवारी १७७९ साली, वडगाव च्या युद्धात ब्रिटीशांनी मराठ्यांमार्फत मुंबईहून आपले सैन्य पाठवले, कर्नल एगर्टनच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी रघुनाथरावांच्या सैन्यासह पुण्याकडे कूच केली. त्यांना पराभूत करण्याचे काम महादजी शिंदे आणि तुकोजी होळकर यांच्यावर होते, या दोघांनी आपल्या तलवारीच्या आणि बुद्धीच्या जोरावर ब्रिटीश सैन्याची गती बरीच मंदावली होती. इतकं की मराठ्यांनी ब्रिटिश सैन्यला अन्न व पाण्यासाठी तरसवल होतं.

१३ जानेवारी १७७९ च्या रात्री महादजी शिंदे यांनी ब्रिटीशांवर केलेल्या हल्ल्यात त्यांचा पूर्णपणे पराभव केला. महादजी शिंदे, त्यांचे शौर्य फक्त एका युद्धाद्वारे सांगता येत नाही, शांतता वेळी त्यांची बुद्धी युद्धाच्या वेळी शांतते काळा पेक्षा अधिक शांत होती.

त्यांनी हैदराबादच्या निजामचा पराभव केला आणि उत्तर भारताच्या राजकारणापासून निजामाचा कायमचा बंदोबस्त केला. टिपू सुलतान ची हुकूमत संपवण्यासाठी निजाम, मराठे आणि ब्रिटीश यांच्या अखंड युतीत महादजींची भूमिका खूप महत्वाची होती.

ब्रिटिशांना हे देखील ठाऊक होते की उत्तर भारत किंवा दक्षिण भारत महादजी यांचं नेतृत्व असल्यामुळे ते मराठ्यांशी कोठेही शत्रुत्व घेऊ शकत नाहीत. मराठा साम्राज्याच्या दोन सर्वोत्कृष्ट रत्नांमध्ये महादजी शिंदे आणि नाना फडणवीस दोघांचेही मतभेद होते, परंतु दोघांनाही इतके चांगले माहित होते की या मतभेदांना त्यांनी कधीही विश्वासघातात रुपांतर होऊ दिले नाही आणि दिल्लीत भगवा झेंडा बऱ्याच काळापर्यंत तसाच फडकत ठेवला होता.

Leave a Comment

You cannot copy content of this page