उन्हाळ्यात फ्रीजचे नव्हे तर मडक्याचे पाणी प्या, आरोग्यासाठी मिळतील आश्चर्यकारक फायदे

उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी थंड पाणी पिणे सगळ्यानाच आवडत. आपण कधी मातीच्या मडक्यातील पाणी प्यायले आहात का? काही वर्षांपूर्वी फ्रिजचा मोठ्या प्रमाणावर वापर होत नव्हता, त्या वेळी मातीची भांडी पाणी साठवण्यासाठी वापरली जात होती कारण मडक्यात पाणी ठेवल्याने नैसर्गिकरित्या पाणी थंड व्हायचं.

आज आपण मडक्याचे पाणी पिण्याचे अद्भुत फायदे जाणून घेणार आहोत. मातीच्या भांड्यात पाणी ठेवल्याने पाण्याची आम्लता कमी होते. असे पाणी प्यायल्याने पीएच संतुलित व्हायला मदत मिळते.

मातीच्या भांड्यात पाणी ठेवल्याने पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते. मातीच्या मडक्याला लहान लहान छिद्रे असतात आणि या छिद्रांमधून पाण्याचे लवकर बाष्पीभवन होते. बाष्पीभवन प्रक्रियेमुळे मडक्यातील पाण्याचे तापमान कमी होते.

आजकाल पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे प्युरिफायर मिळतात, परंतु आपल्याला हे माहित नसेल कि रात्रभर मातीच्या मडक्यात ठेवलेले पाणी नैसर्गिकरित्या शुद्ध देखील केले जाते.

उन्हाळ्यात उष्माघात ही समस्या बऱ्याच जणांना होत असते. मातीच्या मडक्यात असलेल्या भरपूर खनिजे आणि पोषक घटकांमुळे मातीच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने आपले शरीर रीहायड्रेट होण्यास मदत मिळते.

मातीच्या भांड्यातील पाणी दररोज पिल्याने चयापचय क्रिया सुधारते. पाण्यात असलेल्या खनिजांमुळे अन्नपचन क्रिया चांगल्याप्रकारे व्हायला मदत मिळते.

फ्रीजचे थंड पाणी प्यायल्याने घशात खाज आणि खवखव होऊ शकते. पण मातीच्या मडक्यातील पाण्याचे तापमान घशासाठी सौम्य असते आणि त्यामुळे घश्याची खवखव होण्याचा धोका नसतो.

आपल्याला वरती दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत. माहिती आवडली असेल तर कमेंट नक्की करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page