मधमाश्या चावल्या मुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी घरगुती उपाय

मधमाशी चावल्यानंतर शरीराचा तो भाग सूजतो आणि वेदना होतात. मधमाश्यांचे पोळे हे सर्वत्र आढळते डोंगर तसेच जंगलात मधमाशांचे पोळे आढळतात. अश्या या मधमाश्या चावल्या मुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी घरगुती उपायांची माहिती या लेखामध्ये आपण घेणार आहोत.

मधमाशी चावली तर जिथे आपल्याला मधमाशीने चावले आहे ती जागा स्वच्छ करा. मधमाशी डंख केलेल्या जागी छोटासा काटा असतो तो काढून टाका. अन त्यावर थोडासे मध लावा. असे केल्याने वेदना कमी होतात आणि सूज येण्याची शक्यता बऱ्याच अंशी कमी होते.

मधमाशीने चावलेल्या जागेवर थोडासा बेकिंग सोडा पाण्यात मिसळून लावा. असे केल्यास तुम्हाला त्वरित आराम मिळतो. मधमाशीने चावलेल्या जागेवर टूथपेस्ट लावल्यास ही आराम मिळतो.

टूथपेस्टमध्ये असलेले अल्कधर्मी घटक मधमाशीच्या डंखाच्या आम्ल प्रवृत्तीला शांत करते आणि आराम मिळतो. टूथपेस्ट घरात नेहमीच असते, अशा परिस्थितीत सगळ्यात पटकन करता येइल असा हा उपाय आहे. मधमाशी चावली तर त्या जागेवर बर्फ लावा असे केल्याने वेदना कमी होतात.

मधमाशी चावली तर त्या जागेवर कोरफडाचा गर लावल्याने सुद्धा वेदना कमी होतात आणि सूज येण्याची शक्यता बऱ्याच अंशी कमी होते. मधमाशी चावली तर त्या जागेवर खोबरयाचे तेल लावल्याने सुद्धा वेदना कमी होतात.

आपल्याला मधमाश्या चावल्या मुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा;  अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

 

Leave a Comment

You cannot copy content of this page