आपल्या घराच्या आजूबाजूला कचऱ्याचा डेपो असल्यास मच्छरचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. अनेकदा मच्छर चार पाच ठिकाणी चावून गेल्यावर आपल्याला त्याची जाणीव होते. मच्छर चावल्यानंतर अंगावर वण उठतात, लहान फोड येतात याची जळजळ वेदना होऊन खाज सुटते. तर कधीकधी जास्त खाजवल्यामुळे रक्तप्रवाह व त्वचेला ऍलर्जी देखील येते.
या त्रासापासून सुटण्यासाठी मच्छर चावल्यावर त्या ठिकाणी होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी असलेल्या घरगुती उपायांची माहिती आज आपण घेणार आहोत मच्छर चावलेल्या ठिकाणी थोडी सूज आल्यासारखे होते. जळजळ व खाज ही येत असल्यास यावर त्यावर आपण आईस पॅकचा वापर करू शकतो. असे केल्याने आपल्याला आराम मिळेल.
मच्छर चावून गेल्यानंतर त्या ठिकाणी कांद्याचा रस लावल्याने होणारी जळजळ कमी होऊन मच्छर चावल्याचे निशाण निघून जाईल. कांद्याचा वापर केल्यावर काही वेळाने ती जागा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
अजून एक सोपा उपाय म्हणजे लिंबाची साल. रस काढून झाल्यावर उरलेली लिंबाचे साल मच्छर चावलेल्या ठिकाणी लावल्याने खाज कमी होते व निशाणही निघून जातात.
आजकाल सगळे हॅन्ड सॅनिटायजर वापरतात. डास चावल्यावर होणारे इन्फेक्शन कमी करण्यासाठी सॅनिटायजर उत्तम पर्याय आहे. यात अल्कोहोल असतो तसेच यातील जेल मुळे आपल्याला आराम मिळू शकतो. जिथे मच्छर चावेल तिथे याचा वापर नक्कीच फायदेशीर ठरू शकतो.
त्वचेचा पी एच लेवल बॅलन्स करण्यासाठी साबण हा एक उत्तम पर्याय आहे. डास चावल्यावर होणारी जळजळ व इन्फेक्शन थांबवण्यासाठी ती जागा साबणाने धुवून घ्या. त्यानंतर त्यावर नारळाचे तेल लावा. बेकिंग पावडरची पाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि हि डास, मच्छर चावलेल्या जागेवर लावा. आपल्याला आराम वाटेल.
आपल्याला मच्छर चावल्यावर त्या ठिकाणी होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा; अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.