मानसीक तणावामुळे, वेळेवर जेवण न केल्याने, अत्यंत कमी पाणी प्यायल्याने बऱ्याचदा डोकेदुखी होते. हि सामान्य प्रकारची डोकेदुखी असते. जी काही वेळाने बरी होते. मात्र आज आपण डोकेदुखीच्या अशा प्रकाराबद्दल जाणून घेणार आहोत जो सामान्य डोकेदुखीपेक्षा वेगळा आणि वेदनादायी प्रकार आहे.
मायग्रेन हा डोकेदुखीचा प्रकार अत्याधिक तणाव आणि अपुऱ्या झोपेमुळे होतो. मायग्रेनचा त्रास व्हायला लागला कि अर्धे डोके दुखायला लागते, भूक लागत नाही, अंगाला अत्याधिक घाम येतो, कोणताही आवाज सहन होत नाही; म्हणूनच मायग्रेनचा त्रास होत असल्यास त्यावर वेळीच उपचार करणे गरजेच आहे.
आज आपण मायग्रेनच्या वेदनेपासून आराम मिळण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. अर्धे डोके दुखत असल्यास दगडावर चंदन उगाळून आपल्या डोक्याच्या दुखणाऱ्या बाजूवर चंदनाचा लेप लावा.
जर आपल्याकडे चंदन काष्ठ नसेल तर आपण बाजारात मिळणारी चंदन पावडर यासाठी वापरू शकता. चंदन पावडर थोडया थंड पाण्यात मिसळून त्याचा लेप आपल्या कपाळावर लावा. अर्धा तास राहूद्या नंतर थंड पाण्याने धुऊन टाका आपल्याला आराम वाटेल.
मायग्रेनचा त्रास कमी होण्यासाठी कच्चा पेरू दगडावर उगाळून त्याचा लेप आपल्या कपाळावर लावा. 30 मिनिटांनी पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने वेदना कमी होतील. दालचीनी पावडर थोड्याश्या पाण्यामध्ये मिसळून त्याची पेस्ट कपाळावर लावल्याने डोकेदुखी कमी व्हायला मदत मिळेल.
योगा केल्याने मायग्रेनच्या वेदनेपासून आराम मिळायला मदत होते. मायग्रेनचा त्रास असल्यास रोज कमीत कमी अर्धा तास पद्म आसन, शवासन, हस्तपदासन हि योगाआसने करा. 15 मिनिट श्वासांचे व्यायाम अर्थात अनुलोम विलोम करा; 15 मिनिट ध्यानधारणा करा.
योगा आणि व्यायामामुळे तुमचे मन शांत राहण्यास मदत होईल मायग्रेनचा त्रास कमी होण्यासाठी मन शांत राहणे गरजेच आहे. डोकेदुखू नये यासाठी भरपूर पाणी प्या. रात्री जागरण करू नका.
आहारात तीळ, सूर्यफूल बिया, बदाम, अंडी, पीनट बटर यासारख्या मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा समावेश करा. डोळ्यांवर ताण आल्याने देखील डोकेदुखी होऊ शकते म्हणूनच मोबाईलचा वापर करणे कमी करा.
आपल्याला मायग्रेनच्या वेदनेपासून आराम मिळण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. अशीच महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.