आपल्या शरीरातील लिव्हर हा दुसरा सर्वात मोठा अवयव आहे. लिव्हर हे आपल्या पोटाच्या उजव्या बाजूला असते. लिव्हर हे पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांमध्ये असते. आपल्या रोजच्या आहारातील कार्बोहाइड्रेट, प्रोटीन, फॅट या सर्व घटकांचं पचन, विघटन, साठवणूक करण्याचे कार्य आपले लिव्हर करत असते. म्हणूनच आपण लिव्हरची काळजी घेणे गरजेच असत.
शरीरात जमा झालेली फॅट आणि टॉक्सिन्स बाहेर पडण्यासाठी साध्या चहा ऐवजी ग्रीन टी प्यायची सवय लावा. ग्रीन टी प्यायल्याने नैसर्गिकरीत्या लिव्हर साफ राहते.
लिव्हर साफ करण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी पपई खा किंवा पपईचा ज्यूस प्या. पपईमध्ये असणारे पोषक घटक लिव्हर डिटॉक्सिफाय करायला मदत करतात.
लसणामध्ये असणारे एन्झाईम्स आपले लिव्हर निरोगी ठेवायला मदत करतात. सकाळी एक किंवा दोन लसणाच्या पाकळ्या खाल्याने लिव्हर साफ व्हायला मदत मिळते. शरीरात जमा झालेले टॉक्सिन्स बाहेर पडण्यासाठी सकाळी गरम पाण्यात 1 चमचा लिंबू रस मिसळून ते पाणी प्या.
नियमितपणे कारल्याचा रस प्यायल्याने यकृत स्वच्छ राहण्यास मदत होते. कारल्यामध्ये एंटिऑक्सिडंट्स घटकांमुळे आणि पोषक तत्वामुळे शरीरात जमा झालेले टॉक्सिन्स बाहेर पडायला मदत मिळते.
लिव्हर खराब होऊ नये यासाठी अ’ल्क होल युक्त पेय, तेलकट, मसालेदार अन्नपदार्थ, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ खाणे बंद करा. आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या असुद्या.
अशीच चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक / फॉलो करा. आपल्याला लिव्हर साफ करण्यासाठी जबरदस्त घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.