देशातील अनेक राज्यांमध्ये गायी आणि म्हशींमध्ये लम्पी नावाचा त्वचारोगाच्या संसर्ग वाढताना दिसत आहे. ह्या त्वचा रोगामुळे गुजरात, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये हजारो गुरांना हा आजार झालेला आहे.
महाराष्ट्रातील अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, लातूर अकोला, धुळे, पुणे, बीड या जिल्ह्यामध्ये जनावरांना सध्या लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. लम्पी त्वचा रोग हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे जो वेगाने पसरतो आणि विशेषत: कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या गायींना हा आजार लवकर होतो.
लम्पी झालेल्या जनावरांना निरोगी जनावरांपासून दूर ठेवा. आपल्या गोठ्यातील इतर जनावरां आजारी जनावरा जवळ जाऊ देऊ नका. लम्पी झालेल्या जनावरांचे उरलेले पाणी किंवा चारा इतर निरोगी जनावरांना खायला देऊ नका.
गोठ्याच्या आजूबाजूला डास किंवा इतर रक्त शोषणाऱ्या कीटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, कारण त्यांच्याद्वारे गुरांना हा संसर्ग होत आहे.
जनावरांना लम्पी विषाणूची लागण झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांत सौम्य ताप येतो. यानंतर, संपूर्ण शरीरावर मोठे मोठे पुरळ बाहेर येते. काही पुरळ जखमेत बदलतात. याशिवाय बाधित जनावराचे नाक वाहते, तोंडातून लाळ येते, दूध उत्पादन कमी होते.
पायावर तसेच कानामागे सूज येते, गाभण गाई किंवा म्हशीला संसर्ग झाल्यास ग’र्भपाताचा धोका असतो. त्यामुळे वेळीच ह्या आजाराची लक्षणे दिसू लागल्यावर पशु वैद्याचा सल्ला घेणे गरजेच आहे.
लम्पी हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे तो होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून जनावरांचे लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. आपली जनावरे ज्या गोठ्यात बांधली जातात त्या गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखली पाहिजे. ह्या आजाराची लक्षणे दिसू लागल्यावर पशु वैद्याचा सल्ला घेणे गरजेच आहे.
आपल्याला लम्पी आजार झाल्यावर दिसून येणारी लक्षणे हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा; अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.