लाल भोपळ्याला काशी फळ असे देखील म्हटले जातात. आज आपण भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने कोणकोणते फायदे मिळू शकतात हे जाणून घेणार आहोत. लाल भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा-6 फॅटी एसिड, लोह, कॅल्शियम, फोलेट, बीटा कॅरोटीन, बी2 आणि प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात.
लाल भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर घटक असतात. लाल भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने ऑक्सिडेटिव्ह कमी करून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात.
लाल भोपळ्याच्या बियांमध्ये क्युकरबिटासिन हे एक प्रकारचे अमिनो आम्ल असते. जे केसांच्या वाढीस मदत करते. यासाठी दररोज मूठभर भोपळ्याच्या बिया खाव्यात. लाल भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई आणि कॅरोटीनोइड्स भरपूर प्रमाणात असतात. लाल भोपळ्याच्या बियांचे तेल लावल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो.
मानसिक तणावामुळे बऱ्याचदा झोप नीट होत नाही. अशावेळी भोपळ्याच्या बिया नक्कीच खाव्यात. भोपळ्याच्यामध्ये असलेले सेरोटोनिन चांगले असते, ज्यामुळे चांगली झोप यायला मदत मिळते.
भोपळ्याच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर घटक असतात, जे हृदयासाठी चांगले असतात. भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल सुधारण्यास मदत होते.
लाल भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने रक्ताभिसरण चांगले व्हायला मदत मिळते. आपल्याला लाल भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.