लाकडाच्या फर्निचरचे वाळवी वाळवीपासून संरक्षण कसे करावे?

आकर्षक फर्निचरने आपण आपले घर सजवतो मात्र आपल्या घरात आकाराने लहान असणारी वाळवी चा प्रवेश झाला तर आपल्या घरातील मजबूत लाकडी फर्निचर, पुस्तक यांचा नाश व्हायला वेळ लागत नाही. म्हणूनच आज आपण आपल्या घरात असणाऱ्या खुर्च्या, बेड, टेबल अश्या लाकडी फर्निचरचे वाळवीपासून संरक्षण कसे करायचे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

आपले घर स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगर खूप उपयुक्त आहे. व्हिनेगरच्या मदतीने स्वयंपाकघरातील रॅक आणि घाण साफ करता येते, शिवाय वाळवी घालवण्यासाठी याचा खूप उपयोग होतो. यासाठी दोन लिंबाचा रस अर्धा कप व्हिनेगरमध्ये मिसळा अशा प्रकारे आपले वाळवी घालवण्यासाठीचा स्प्रे तयार झाला. हा स्प्रे आपल्या लाकडी फर्निचरवर फवारणी करा. हा स्प्रे केल्याने वाळवी निघून जाईल.

लाकडाच्या फर्निचरचे वाळवी वाळवीपासून संरक्षण करण्यासाठी आपण कडुलिंबाच्या तेलाचा वापर करू शकता. यासाठी एक  कापसाचा तुकडा घ्या त्यावर कडुलिंबाचे तेल लावा. त्यानंतर ज्या ठिकाणी वाळवी झाली आहे त्या ठिकाणी  कडुलिंबाचे तेल लावावे. असे केल्याने काही दिवसातच आपल्या फर्निचर वरची वाळवी निघून जाईल.

कोणत्याही लाकडी वस्तूला वाळवी लागली असल्यास त्यापासून सुटका करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे त्या वस्तूला सूर्यप्रकाशात ठेवणे. आपण दिवसभरात ४ ते ५ तास आपले फर्निचर उन्हात ठेवले तर 2 ते 3 दिवसात आपल्या फर्निचर वरील वाळवी निघून जाईल.

आपल्याला लाकडाच्या फर्निचरचे वाळवी वाळवीपासून संरक्षण कसे करायचे हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा; अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page