कोरडा खोकला येत असल्यास करा हे घरगुती उपाय

बदलत्या हवामानामुळे बऱ्याचदा खोकला आणि सर्दी होते, ज्यामुळे श्वास घेण्यात त्रास होतो आणि आरोग्यावरही परिणाम होतो. धूर, प्रदूषित वातावरण आणि जंतू यांमुळे घशाचा व श्वसननलिकेला दाह होतो. यामुळे कोरडा खोकला येतो. आज आपण कोरड्या खोकल्यापासून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपायांबद्दल जाणून घेणार आहोत.

आल्यामध्ये एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे कोरड्या खोकल्यापासून मुक्त होण्यास मदत करतात. हळदीमध्ये एन्टी-बॅक्टेरियल, एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे घशाच्या संसर्गाशी लढण्यासाठी मदत करतात. यासाठी एका ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा हळद पावडर मिसळून प्या. असे केल्याने आपल्याला कोरड्या खोकल्यापासून आराम मिळेल.

अडुळसा पानांचा काढा कोरडया खोकल्यासाठी फार उपयुक्त आहे. यासाठी 5 ते 6 आडूळश्याची पाने घ्या त्यानंतर दोन ग्लास पाणी घ्या त्यामध्ये हि पाने टाकून चांगले उकळून घ्या. त्यानंतर हा काढा दिवसातून 3-4 वेळा घ्या.

खोकल्याबरोबरच श्वसन संस्थेतील इतर बिघाड झाला, तर ते थांबवन्यासाठी दररोज चार तुळशीची पाने चार मिरीबरोबर चघळा. कोरफड मध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत जे कोरड्या खोकल्यापासून मुक्त होण्यास मदत करतात. खोकल्या पासून आराम मिळण्यासाठी मधात मिसळून कोरफड रस प्या.

छाती, नाक, कपाळ ओव्याने शेकावे व ज्वारीच्या पिठाची धुरी घ्यावी. घशामध्ये खवखव लागल्यास लवंग, ओवा तोंडामध्ये चघळा, असे केल्याने तोंडाला चव येते आणि आरामही मिळतो. आपल्याला कोरडा खोकल्यावर  घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page