कोरडा खोकला घरगुती उपाय

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे, हवेत असलेल्या धुळीमुळे, धुरामुळे खोकला येणे, घसा दुखणे, सर्दी होणे अशा समस्या आपल्यापैकी बऱ्याच जणांना जाणवत असेल. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत कोरडा खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी घरगुती उपाय.

कोरड्या खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी आपण आल्याचा वापर करू शकतो. आल्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे घटक असतात. आल्याचा 1 छोटासा तुकडा किसून घ्या त्यानंतर ग्लासभर पाण्यात किसलेले आले मिसळून ते पाणी चांगले 5 मिनटे उकळून घ्या त्यानंतर हे पाणी गाळून घ्या.

हे पाणी कोमट असतानाच त्यामध्ये 1 चमचा मध मिसळून दिवसातून 3 वेळा प्या. ह्या उपाय केल्याने आपल्याला येणारा खोकला थांबेल आणि घसा देखील मोकळा होईल. खोकल्या बरोबरच आपल्याला सर्दी झालेली असल्यास रात्री झोपायच्या आधी एक ग्लास गरम दुधात थोडीशी हळद पावडर मिसळून प्या.

हळद टाकलेल्या दुधामध्ये अँटीमाइक्रोबियल गुणधर्म असतात ज्यामुळे आपली सर्दी कमी होते. आयुर्वेदामध्ये सांगितले आहे कि हळदीचे दुध प्यायल्याने आपली रोग प्रतिकार शक्ती देखील मजबूत होते.

खोकल्या बरोबरच आपल्या घश्यात खवखव जाणवत असल्यास घसा दुखत असल्यास घसा मोकळा होण्यासाठी अर्धा  चमचा दालचिनी पावडर 1 ग्लास पाण्यात मिसळून ते पाणी चांगले उकळून घ्या त्यानंतर ते पाणी गाळणीने गाळून घ्या. हे पाणी कोमट असतानाच त्यामध्ये थोडेसे मध मिसळून प्या. दिवसातून 3 वेळा आपण हा उपाय केल्यास आपल्याला आराम मिळेल.

कोरडा खोकला कमी होण्यासाठी सकाळी रिकाम्यापोटी लसणाच्या 3-4 पाकळ्या ठेचून चमचाभर मधात मिसळून खा. मध आणि लसून खाल्याने आपल्याला येणारा कोरडा खोकला थांबेल तसेच आपली रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत होईल.

खोकल्यामुळे आपल्या छाती मध्ये कफ जमा झाला असल्यास कफ मोकळा होण्यासाठी 1 चमचा जेष्ठमध पावडर ग्लासभर पाण्यात मिसळून ते उकळून घ्या. नंतर ते पाणी गाळून घ्या. त्यामध्ये थोडी खडी साखर मिसळून गरम असतानाच हे पाणी प्या. दिवसातून तीन वेळा हा उपाय केल्याने छातीत असणारा कफ मोकळा होईल.

आम्हाला आशा आहे कि वरती दिलेली कोरडा खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंट करून आम्हाला सांगाल.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page