कोरडा खोकला दूर करण्यासाठी 6 घरगुती उपाय

हवामान बदलामुळे पावसाळ्यात सर्दी खोकला हे आजार मोठ्या प्रमाणात होतात. पावसाळ्यात थंड आणि शिळे अन्न पदार्थ खाल्याने, बाहेरचे उघड्यावरचे अन्नपदार्थ खाल्याने आपल्याला सर्दी खोकला असे आजार होण्याचा धोका असतो. म्हणूनच आज आपण कोरडा खोकला दूर करण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

कोरडा खोकला घालविण्यासाठी आले खूप उपयुक्त आहे आल्यामध्ये एन्टी मायक्रोबियल आणि एन्टी इंफ्लामेटरी गुणधर्म असतात. खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी आल्याचा छोटा तुकडा बारीच ठेचून त्यात एक चुटकीभर मीठ मिसळून गोळी बनवा. आणि हि गोळी चघळा. हा उपाय केल्याने आपल्याला येणारा खोकला थांबेल.

तुळशीची पाने पाण्यात टाकून उकळा थोडे थंड झाल्यावर त्यामध्ये मध मिसळून प्या असे केल्याने खोकला थांबायला मदत मिळेल. कोरडा खोकला येत असल्यास कोमट पाणी प्या असे केल्याने घसा मोकळा होईल. आणि आपल्याला आराम वाटेल.

रात्री झोपण्याच्या अर्धा तास आधी 1 चमचा मध खाल्ल्याने कफ कमी होऊन झोप चांगली लागते. खोकला येत असल्यास पाठीवर झोपण्याऐवजी डाव्या कुशीवर झोपा. यामुळे कफ लवकर बाहेर पडण्यास मदत मिळते.

सकाळ संध्याकाळ 1 कप गुळवेल काढा घेतल्याने खोकल्यापासून आराम मिळतो. सावलीत वाळवलेली डाळिंबाची साल तोंडात ठेवून चोखत रहा. असे केल्याने कोरड्या खोकल्यापासून आराम मिळेल.

रात्री झोपायच्या आधी कोमट दुधात थोडीशी हळद पावडर मिसळलेले दुध प्यायल्याने खोकला कमी व्हायला मदत होते. घसा मोकळा होतो.

आपल्याला कोरडा खोकला दूर करण्यासाठी 6 घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. कोणताही उपाय करण्याआधी आपल्या फॅमिली डॉ सल्ला अवश्य घ्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page