त्वचा कोरडी पडू नये यासाठी घरगुती उपाय

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणे अगदी सामान्य गोष्ट आहे; आपल्यापैकी बऱ्याच जणांना ह्या समस्येला सामोर जाव लागत. आज आपण आपली त्वचा कोरडी का पडते याचे कारण आणि त्वचा कोरडी पडू नये यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

हिवाळ्यात थंडीमुळे आपल्या शरीराची पाण्याची गरज पूर्ण होत नाही, हिवाळ्यात कमी पाणी प्यायल्याने आपल्या हात, पाय आणि चेहऱ्याची त्वचा कोरडी पडते.

याशिवाय जास्त गरम पाण्यानी अंघोळ केल्याने देखील त्वचा कोरडी पडू शकते; आपण अंघोळ करताना जे केमिकलयुक्त साबण लावतो त्यामुळे त्वचा कोरडी पडते. आता आपण जाणून घेऊयात त्वचा कोरडी पडू नये यासाठी घरगुती उपाय

त्वचा कोरडी पडू नये यासाठी रात्री झोपण्याआधी कोमट पाण्याने आपले हात, पाय आणि चेहरा धुऊन त्यावर हलक्या हाताने बदाम तेल लावा; बदाम तेलामध्ये विटामिन ई हा त्वचेसाठी महत्वाचा पोषक घटक मोठ्या प्रमाणात असल्याने बदाम तेल लावल्याने आपल्या त्वचेला आलेला कोरडेपणा कमी होईल.

आपल्या त्वचेला आलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी आपण कोरफड जेल देखील लावू शकता कोरफड जेल लावल्याने आपली त्वचा पुर्वव्रत होईल.

त्वचेला आलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी आपण दुधाची साय आपल्या त्वचेवर लावू शकता. दुधाच्या सायीमध्ये स्निग्धता असल्यामुळे त्वचेवरील रखरखितपणा कमी होण्यास मदत होते. आपल्याला त्वचा कोरडी पडू नये यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page