कोणत्या विटामिनच्या कमतरतेमुळे सारखे सारखे तोंड येते? घरगुती उपाय

आपल्या खाण्या पिण्याच्या सवयीमुळे, रात्री पुरेश्या प्रमाणात झोप घेत नसल्यास त्यामुळे, शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे, पोट साफ होत नसल्यास त्यामुळे, जास्त तिखट-मसालेदार पदार्थ खाल्याने, आपल्या शरीरात विटामिन बी12, विटामिन बी6 ची कमतरता असल्यास आपल्या तोंडाला आतल्या बाजून फोड येऊ शकतात.

तोंडाला आतल्या बाजून फोड आल्यावर जेवण करणे हि अवघड होऊन जाते. आज आपण तोंडाला आतल्या बाजूने फोड आल्यावर नेमके कोणकोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात हे जाणून घेणार आहोत.

तोंडाला आतल्या बाजूने फोड आलेले असल्यास अश्यावेळी दिवसातून 3-4 वेळेस ताकाने गुळण्या करा. ताकाने गुळण्या केल्याने वेदना कमी होऊन आपल्याला आराम मिळू शकतो.

नियमितपणे कपभर ताक प्यायल्याने आपल्या शरीरात असलेली विटामिन बी12 कमतरता देखील दूर व्हायला मदत होईल. तोंडाला आलेल्या फोडावर ग्लिसरीन लावल्याने वेदना कमी व्हायला मदत होते तसेच तोंडाला आतल्या बाजूने झालेल्या जखमा देखील बऱ्या होतात.

तोंडाला आलेले फोड बरे होण्यासाठी दिवसातून दोन वेळा कपभर कोमट पाण्यात अपल सायडर व्हिनेगर मिसळून गुळण्या करा. अपल सायडर व्हिनेगरमध्ये असणाऱ्या अम्लीय घटकांमुळे तोंडातील फोड बरे होतात. तोंडातील फोडांवर कोरफड गर लावल्याने वेदना कमी होतात. आणि फोड देखील कमी होतील.

आपले तोंड सारखे सारखे येऊ नये यासाठी विटामिन बी12 असलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करा. दुध, दुग्धजन्य पदार्थ यामध्ये विटामिन बी12 असते अश्या गोष्टींचा आहारात समावेश असुद्या. आपल्याला तोंडाला फोड आल्यावर कोणकोणते घरगुती उपाय करायचे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. कोणताही उपाय करण्याआधी आपल्या फॅमिली डॉ चा सल्ला अवश्य घ्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page