कोणत्या महिन्यात किती दिवस असावेत, हे कोणी निश्चित केले?

पूर्वी नवीन कॅलेंडर आलं की त्याचंही अप्रूप असायचं. कॅलेंडरची कुणी जाहिरात करु शकतं? यावर आता विश्वास बसणार नाही, पण दूरदूर्शन वर रेणुका शहाणेची तीन-चार भाषांमध्ये कालनिर्णयची जाहिरात यायची, आजही कित्येक लोकांची पाठ असेल.

पण कधी विचार केला आहे का की कॅलेंडर मध्ये ३० दिवसच का असतात. याची सुरुवात कशी झाली भारतीय संस्कृती तर चंद्र सूर्य आणि तारे वातावरणातील बदल ऋतू यांच्या अभ्यास करून बनवले आपल्या संस्कृतीत च ठीक पण बाकी ठिकाणी कसे बनवले याच नक्की आश्चर्य वाटत असेल आज आपण जाणून घेऊयात की आता आपण जे कॅलेंडर वापरतो त्याचे महिने अन दिवस कसे ठरले.

जगातल्या कित्येक प्राचीन संस्कृती अवकाशाकडे ताऱ्यांचा नकाशा अन दिशा समजून घेण्यासाठी म्हणून पाहू लागले. हजारो लाखो वर्षांपासून मनुष्य ह्या सृष्टीकडे आणि वरच्या नभा मंडलात नीट लक्ष देऊन बघत होता.

कोणत्या वेळी निसर्गात काय काय घडतं यावर त्याचं बारीक लक्ष होतं. मग ह्या घटनाक्रमाचे आकाशात असलेल्या सूर्य, चंद्र तारे यांचं काही नातं आहे का असा प्रश्न त्याला भेडसावू लागला. जसं व्यापार वाढला, दळणवळण वाढलं तसं गणित वाढलं आणि त्याचसोबत निसर्ग, भूगोल आणि आकाश यांचा दैनंदिन जीवनात घडणाऱ्या परिणामाशी वेगळंच नातं उलगडू लागलं.

उन्ह पावसाचा खेळ, बर्फाची जादुई चादर, निसर्गात येणारी फुलं, नव्या पालव्या कधी फुटणार, वातावरणात कधी गरम व्हायचं, गार वारा कधी व्हायला सुरुवात होणार.

शेती करताना धान्याांसाठी उपयुक्त असे थंड किंवा गरम तापमान केव्हा येईल हेही भाकीत करू लागले. ह्यातूनच जशी उत्पन्न झाली आकडेमोड किंवा नागरी व्यवस्था करताना असलेल्या अंकगणित आणि भुमितीची गरज, तसंच प्रवास, शेती, वर्षभराची कामे करताना पद्धतशीर वेळ आणि दिवस यांची नोंद करण्याची गरज.

आता दिवस आणि महिने ह्यांना नवे कोणी दिली तर सर्वप्रथम त्याचा उल्लेख रोमन साम्राज्यात २१०० वर्षांपूर्वी सापडतो. आपल्याकडे जसे तिथी आणि मुहूर्त पाहून यज्ञ करायचे तसेच रोमन राजे सुद्धा त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या तिथींना ऋतु बदलामध्ये दोन वसंत ऋतुंमध्ये असलेले ३६० दिवस यांची नोंद ठेऊन नंतर त्यांना ३६ दिवसांच्या महिन्यामध्ये वाटून नावे द्यायचे. ही नावे जुन्या रोमन देवांची होती. सुरुवातीला वार्षिक १० महिने असत आणि त्यांना रोमानास नावाच्या राजाने नावे ठेवलेली आहेत.

मार्स ही देवता युद्धाचा देव म्हणून ओळखली जायची म्हणून त्या देवाच्या नावाने एक महिना म्हणजे मार्च, त्याच प्रमाणे मग एप्रीलस ज्याचा लॅटिन अर्थ सुरू होणे, उदघाटन होणे असा होतो. त्या महिन्यात पालवी फुटायची वसंताचे आगमन. माईया हे नाव ग्रीक संस्कृती नुसार वसंतदेवी, ज्यूनो रोमन देवराज जीयस याची ‘जूनो’ ही पत्नी आहे. ‘जुबेनियस’ या शब्दापासून जूनो शब्द तयार झाला. त्याचा अर्थ ‘विवाह योग्य कन्या’ असा होतो.

रोमन सम्राट ज्युलियस सिजर याचा जन्म या महिन्यात झाल्याने याचे नाव जुलै ठेवले. त्यापूर्वी ‘क्वाटिलिस’ असे होते. ऑगस्ट या महिन्याचे नाव जूलियस सीजरचा पुतण्या आगस्टस सीजर याने आपल्या नावावर ठेवले. या महिन्याचे यापूर्वी नाव ‘सॅबिस्टलिस’ असे होते.

प्राचीन रोमन कॅलेंडरमध्ये सातवे स्‍थान होते. म्हणून त्याला तेव्हा सप्टाम असे म्हटले जायचे त्यावरून त्याच नाव सप्टेंबर पडले. त्या त्या अंकांनुसार त्यांची नावे पडली अन ती तशीच राहिली जस ऑक्टोबर या महिन्याला प्राचिन रोमन कॅलेंडरमध्ये आठवे स्‍थान होते.

‘नोव्हेबर’ हे नाव ‘नोवज’ या लॅटिन शब्दावरून पडले. याचा अर्थ ’९’ असा होतो. हा प्राचिन रोमन कॅलेंडरमध्ये नववा महिना होता. डेसेंबर’ हा शब्द लॅटिन शब्द ‘डेसेम’ पासून तयार झाला. हा प्राचीन रोमन कॅलेंडरमधील दहावा महिना होता. आता प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की मग सप्टेंबर तर नववा महिना आहे मग सातव्या स्थानी कसा काय? तर त्याची गम्मत अशी की.

२०० वर्षांनंतर मग त्यात जानेवारी आणि फेब्रुवारी महिने आले आणि महिने १२ करण्यात आले. ह्याचे स्पष्ट कारण इतिहासात मिळत नाही पण एक आख्यायिका अशी सांगितली जाते जॅनरियुस’ हे नाव ‘जानूस’ किंवा ’जेनस’ या रोमन देवाच्या आधारे पडले. पोटासमोर आणि पाठीमागे अशी दोन तोंडे या देवाला असल्याची अख्यायिका असल्यामुळे हा देव एकाच वेळी मागे आणि पुढे पाहू शकतो.

जानेवारी महिन्याचेही असेच आहे. जानेवारीमध्ये मागील वर्षाला विसरले जात नाही आणि नवीन वर्षाचे स्‍वागत केले जाते. ’फेब्रुवारी’ असा ‘फॅबीएरियुस’ हा लॅटीन शब्‍दापासून आला असून त्याचा अर्थ शुद्ध करणे असा होतो. हा महिना प्राचीन रोमन संस्‍कृतीमध्ये आत्मशुद्धी आणि प्रायश्चित करण्यासाठी मह्त्वाचा मानला जात असल्यामुळे त्याला फेब्रुवारी असे नाव दिले गेले.

नंतर जसजशी प्रगत खगोलीय उपकरणे येऊ लागली तसतसे अवकाशात असलेल्या चंद्र स्थिती, सूर्य स्थिती, तारका स्थिती ह्या अशा कॅलेंडर मध्ये सुसूत्रता आणत गेल्या आणि प्रत्येक महिना कसा संपतो ह्यावर खगोल शास्त्र म्हणून अध्ययन सुरू होऊ लागले. शेवटी सौर्य फेरी नुसार ३६५ दिवस ठरले पण ते १२ महिन्यात विभागायचे कसे म्हणून केवळ सोयीसाठी काही महिन्यांनी १ दिवस अधिकचे देण्यात आले.

त्यातही फेब्रुवारी ची कथा ही एक अतिरिक्त महिना म्हणूनच आहे. चांद्र कला दोन पंधरवडे म्हणजे महिना आणि सौऱ्य फेरी यांची सांगड घालताना चार वर्षात येणारे लीप वर्ष आणि फेब्रुवारीचां अधिकचा दिवस अशी योजना करण्यात आली.

Leave a Comment

You cannot copy content of this page