जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगामध्ये सगळ्यात जास्त मृत्यू होण्याचे कारण हृदयविकार हे आहे. आजकाल हृदयविकाराचा झटका येणे हि समस्या खूप सामान्य झाली आहे. वाढत प्रदूषण, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, आणि व्यस्त जीवनशैली यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूमध्ये वाढ झाली आहे.
एका संशोधनात हृदयविकाराचा झटका आल्याबद्दल एक नवीन खुलासा करण्यात आला आहे. या अभ्यासात असे सांगितले आहे की कोणत्या रक्तगटाच्या लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका सर्वाधिक असतो. आणि कोणत्या रक्तगटाच्या लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका हा कमी असतो.
हृदयविकाराचा झटका आणि रक्तगट याबाबतीत संशोधन करताना, संशोधकांना असे दिसून आले की ज्यांचा रक्तगट ओ नसतो त्यांना हृदयविकाराचा सर्वाधिक धोका असतो. या नवीन अभ्यासात, संशोधकांना हृदयविकाराचा झटका सर्वाधिक किंवा सर्वात कमी धोका असलेले रक्त गट असल्याचे आढळले आहे. यामध्ये ए आणि बी रक्तगट असणा-यांना सर्वाधिक धोका असल्याचे दिसून आले.
हृदयविकाराचा झटका आणि रक्तगट या संशोधनामध्ये जवळपास 4 लाख लोकांचा समावेश करण्यात आला होता. रक्त गट ए आणि रक्त गट ब आणि रक्त गट ओ या तीन गटातील लोकांनी यामध्ये भाग घेतला होता. या संशोधनात असे आढळले की रक्तगट ए आणि रक्तगट बी असलेल्या लोकांमध्ये रक्तगट ओ असलेल्या लोकांपेक्षा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 8 टक्के जास्त असते.
संशोधकांना असे दिसून आले कि रक्तगट बी असलेल्या लोकांमध्ये ओ रक्तगट असलेल्या लोकांपेक्षा हृदयविकाराचा झटका अर्थात हार्ट अॅटक येण्याची शक्यता 15 टक्के जास्त असते. आणि ओ रक्तगट असलेल्या लोकांपेक्षा ए रक्तगटाच्या लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका 11 टक्क्यांनी जास्त असू शकतो.
आता हे वाचून तुमच्याही मनात प्रश्न आला असेल कि हे कसे शक्य आहे वेगवेगळ्या रक्त गटाचा आणि हृदयविकाराचा काय सबंध असू शकतो. तर याच उत्तर अगदी सोप आहे. रक्तगट ए आणि रक्तगट बी असणा-या लोकांचे रक्त रक्तगट ओ असणाऱ्या लोकांपेक्षा 44 टक्के लवकर गुठळ्या होण्याची शक्यता असते.
जेव्हा आपल्या शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात, तेव्हा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता देखील जास्त असते. म्हणजेच रक्त सामान्यपेक्षा दाट असेल तेव्हा हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. यामुळे हार्ट अटॅकची हि शक्यता वाढते.
आपल्याला कोणत्या “दोन रक्तगटांमध्ये” हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण सर्वाधिक असते? हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा; अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.