निरोगी राहण्यासाठी कोणत्या भांड्यात अन्न शिजवले पाहिजे

पूर्वीच्या काळी घरांमध्ये स्वयंपाकासाठी लोखंडाची, तांब्या पितळची आणि मातीची भांडी वापरली जायची. मातीच्या भांड्यात भाज्या, अन्न शिजवल्याने भाज्यांमध्ये असणारे पोषक तत्व, विटामिन टिकून राहतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहायचे. त्यांची रोग प्रतिकार शक्ती चांगली राहायची. ते सहसा आजारी पडत नसायचे.

अल्युमिनियमच्या भांड्यांत अन्न लवकर शिजते त्यामुळे आपल्या स्वयंपाकघरात अल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र अल्युमिनियमच्या भांड्यांत भाज्या शिजवल्याने त्यामधील पोषकतत्त्वे नष्ट होतात. अल्युमिनियम भांड्यात शिजवलेल्या भाज्यांचा रंग बदलतो, चव बदलते, अल्युमिनियमची भांडी घासताना हाताला काळसरपणा येतो.

अल्युमिनियम हा एक प्रकारचा थायरोटॉक्सिक धातू आहे जो अन्नात सहज विरघळतो. अल्युमिनियमच्या भांड्यात आंबट पदार्थ शिजवल्याने रासायनिक प्रक्रिया होऊन अन्न विषारी बनू शकते असे अन्न खाल्याने पोटात दुखू शकते आणि मळमळ होऊ शकते, अल्युमिनियम हा एक जड धातू जो हळहळू आपल्या शरीरात जाऊन आपल्याला वेगवेगळे आजार देऊ शकतो. आपली रोग प्रतिकार शक्ती कमी करू शकतो.

स्वयंपाक घरात स्टेनलेस स्टील च्या भांड्यांचा वापर केल्याने अन्न पदार्थ लवकर शिजतात, अन्न पदार्थांची चव बदलत नाही. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा वापर आपण करू शकता.

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने आपल्या असणारा पित्ताचा आजार दूर होतो. आपल्या शरीरातील सर्व घाण लघवी वाटे निघून जाते. शरीरातील कोलेस्ट्रोलचे प्रमाण संतुलित होते. तांब्याच्या भांड्यात अन्न शिजवल्याने सुमारे 90 टक्के पोषक तत्वे अन्न शिजवल्यानंतर सुद्धा अन्न पदार्थांमध्ये टिकून राहतात. तांब्या पितळ च्या भांड्यांमध्ये आंबट पदार्थ शिजवू नये.

लोखंडाच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवल्यामुळे आपल्या शरीरात असणारी लोहाची कमतरता दूर होते, हिमग्लोबीन वाढायला मदत मिळते. मात्र लोखंडाची भांड्याला गंज लागलेला असल्यास अशा भांड्यात अन्न शिजवू नये.

नॉन-स्टिक भांड्यावर टेफ्लॉन लेप असतो. त्यात कॅडमियम आणि पारा असतो. ज्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. या भांड्यांमध्ये अन्न शिजवल्यामुळे किडनी, यकृताचे आजार, हृदयविकार यांसारख्या आजारांचा धोका वाढतो.

मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्याने अन्न स्वादिष्ट बनते मातीमध्ये असणारे लोह, फॉस्फरस, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे असे पोषक घटक अन्नामध्ये समाविष्ट होतात. जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. अन्नातील पोषक तत्वे टिकून राहतात. अपचन आणि गॅसची समस्या दूर होते. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.

आम्हाला आशा आहे कि वरती दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल. आपल्याला निरोगी राहण्यासाठी कोणत्या भांड्यात अन्न शिजवले पाहिजे हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा; अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page