कोणते ड्रायफ्रूट कधी खावे? आणि त्यापासून शरीराला कोणते फायदे होतात

ड्राय फ्रूट्समध्ये आपल्या शरीराला आवश्यक पोषक तत्व मोठ्या प्रमाणात असतात. उत्तम आरोग्यासाठी सुका मेवा खाण्याची प्रथा शतकानुशतके जुनी आहे, कारण त्यात भरपूर पोषकतत्व आणि सर्व जीवनसत्त्वे असतात.

ड्रायफ्रूट खाल्याने आपली पचनसंस्था, हाडे आणि स्नायू. मजबूत होतात; रक्ताभिसरण सुधारते. कोलेस्टरॉल, मधुमेह, उच्च रक्तदाब, ताणतणाव, हृदयविकार, त्वचाविकार आणि पचनक्रिया नियंत्रित ठेवण्याची क्षमता ड्रायफ्रूटमध्ये असते.

अनेक अन्नपदार्थ स्वादिष्ट बनवण्यासाठी ड्राय फ्रूट्स  वापरले जातात, परंतु ड्रायफ्रूटमध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटक असल्याने ते संतुलित प्रमाणात आणि योग्य वेळी सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. म्हणूनच आज आपण कोणत्या ड्रायफ्रुट्सचे सेवन कधी करावे हे जाणून घेणार आहोत.

सुक्या मेव्यांचा प्रभाव उष्ण असतो, त्यामुळे हिवाळ्यात त्यांचे सेवन अधिक फायदेशीर असते. कारण त्यात असलेल्या मायक्रोन्यूट्रिएंट आणि अँटी-ऑक्सिडंट घटकांमुळे सुक्यामेव्याचे सेवन केल्याने आपल्या शरीराचे थंडीपासून संरक्षण होते. फायबर, कॅलरीज आणि फॅट भरपूर प्रमाणात असल्याने, त्यांचे कमी प्रमाणात सेवन केल्याने पोट भरल्यासारखे वाटते,

सुक्या मेव्यामध्ये प्रथिने, फायबर, फॉलिक असिड, जीवनसत्त्वे, खनिजे मुबलक प्रमाणात असल्यामुळे ते शरीराला ऊर्जावान बनवतात, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

हिवाळ्यात बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड, खजूर, अंजीर, मनुका हे पदार्थ जरूर खावेत. सुक्या मेव्याचे सेवन केल्याने आपण शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवू शकता मात्र जास्त प्रमाणात सुक्या मेव्याचे सेवन करणे देखील आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

ड्राय फ्रूट्स का खावे आणि कोणते ड्राय फ्रूट्स कधी खावे? काजू आणि पिस्ता यामध्ये भरपूर मॅंगनीज आणि खनिजे असतात, जे शरीरातील अतिरिक्त चरबी पचवण्यास, रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. यांचे सेवन केल्याने दिवसभराचा थकवा आणि तणाव दूर होतो.

जास्त उष्मांक असलेले काजू शरीराला ऊर्जा देतात आणि प्रतिकारशक्ती वाढवतात. ते खाण्याचा सर्वोत्तम वेळ म्हणजे दुपारच्या जेवणानंतर आपण खाऊ शकता. काजू मध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्याने काजूचे सेवन रात्री करणे टाळा अन्यथा आपल्या पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो.

बदामामध्ये मोठ्या प्रमाणात मोनोसॅच्युरेटेड फॅट असते जे शरीराला उबदार बनवते आणि आतून मजबूत बनवते. शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते.

रोज सकाळी 4 ते 5 बदाम रात्री पाण्यात भिजवून खावेत. त्यात असलेले जीवनसत्त्वे आणि खनिजे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात आणि शरीराला संसर्गजन्य घटकांपासून वाचवतात.

अक्रोड, मनुका, खजूर हे सर्व ड्रायफ्रुट्स पचनक्रिया सुरळीत ठेवतात. त्यामध्ये असलेली खनिजे आणि जीवनसत्त्वे त्वचेच्या ऊतींची दुरुस्ती करतात. शरीरातील कॅलरीज बर्न करतात आणि ऊर्जा निर्माण करतात आणि शरीर उबदार ठेवतात, तसेच संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करतात.

यामध्ये असलेले फायबर बद्धकोष्ठता सारख्या समस्यांपासून बचाव करते, पचनसंस्था निरोगी ठेवते, अक्रोड मध्ये विविध पौष्टिक आणि अँटी-ऑक्सिडंट घटक रोगांशी लढण्याची आणि इन्सुलिनची पातळी नियंत्रित करण्याची अद्भुत क्षमता असते.

त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर आणि झोपण्यापूर्वी त्यांचे सेवन करावे. खजूर महिलांमध्ये रजोनिवृत्ती नंतरच्या समस्यांपासून आराम देतात आणि हिवाळ्यात ऑस्टियोपोरोसिस किंवा सांधेदुखीच्या तक्रारींपासून आराम देतात.

आपल्याला कोणते ड्रायफ्रूट कधी खावे? आणि त्यापासून शरीराला कोणते फायदे होतात ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page