थंडीच्या दिवसांमध्ये डोक्यामध्ये कोंडा होण्याचे प्रमाण जास्त असते. केस गळतीचे मुख्य कारण कोंडा होणे हे आहे. कोंडा झाल्यामुळे डोक्यामध्ये खाज सुटते आणि त्याच्या जखमा होतात. ही समस्या सामान्य असली तरीही त्याकडे दुर्लक्ष झाले नाही पाहिजे. कोंडा कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो.
परंतु थंडीच्या दिवसांमध्ये कोंडा कमी होण्याचे प्रमाण फार कमी असते. त्यामुळे थंडीच्या दिवसात जास्त केस गळतात. ही केस गळती रोखण्यासाठी काही उपाय आहेत. कडुलिंबाची पाने स्वच्छ धुऊन वाटून घ्या. ही पेस्ट केसांना काही काळ लावून ठेवा.
पेस्ट सुकल्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. यामुळे केसांमधील कोंडा निघून जाईल. तसेच कोंड्यामुळे झालेल्या जखमा बऱ्या होतील. आणि केस गळतीचे प्रमाण थांबेल.
लिंबाच्या रसाने केसांना मसाज केल्याने कोंडा निघून जातो. एका वाटीमध्ये लिंबाचा रस घेऊन केसांना लावा. लिंबाचा रस केसांना लावल्यानंतर शाम्पू लावणे टाळावे. कोमट पाण्याने केस धुवा. लिंबूमध्ये अनेक पोषक घटक आहेत. जे केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहेत. कोंड्यामुळे होणारी केस गळती होणार नाही.
मेथीचे दाणे केसांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. दोन चमचे मेथी कपभर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा. सकाळी बारीक वाटून त्याची पेस्ट 30 मिनिटांनी पर्यंत केसांना लावून ठेवा. काही वेळाने केस स्वच्छट धुवा. ही समस्या दूर होईल.
आवळा हा केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. केस गळती किंवा केसांमध्ये होणारा कोंडा कमी करण्यासाठी आवळा तेल वापरल्यास कोंडा दूर होतो. आवळ्याच्या पावडरचा लेप केसांना लावून केस धुतल्यास कोंडा निघून जाईल आणि त्यामुळे होणारे केस गळती रोखली जाईल.
आपल्याला कोंड्यामुळे केस गळत असल्यास कोणकोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.