रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात 1 – 2 लवंग घाला आणि सकाळी उठून ते पाणी प्यायल्याने मिळणारे फायदे

निरोगी आणि स्वस्थ राहण्यासाठी आपल्या स्वयंपाकघरातील मसाल्याच्या डब्यात आढळणाऱ्या लवंग ह्या औषधी गुणधर्म असणाऱ्या मसाला घटकाचा वापर कसा करायचा हे आज आपण या लेखामधून समजून घेणार आहोत.

लवंगमध्ये व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन के, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फायबर, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम, फॉस्फरस असे पोषक घटक असतात.

रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट पाण्यात 1 -2 लवंग भिजायला ठेवा सकाळी झोपेतून उठल्यानंतर हे पाणी पिऊन त्यामधील लवंग चघळा.

ज्या पुरुषांमध्ये शारीरिक कमजोरी आहे त्यांनी कोमट पाण्यात भिजवलेली लवंग अवश्य चघळली पाहिजे कारण लवंगमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम आणि झिंक ही खनिजे भरपूर प्रमाणात असतात.

ज्यामुळे शारीरिक कमजोरी दूर व्हायला मदत मिळते. शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते मात्र लवंग उष्ण गुणधर्म असणारी असल्याने आठवड्यातून एक ते दोन वेळाच हा उपाय करा.

सकाळी एक ग्लास कोमट पाणी आणि भिजवलेली लवंग चघळल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहायला मदत मिळते. कोमट पाण्यामध्ये 1 -2 लवंगांची पावडर करून मिसळा आणि असे पाणी सकाळी प्यायल्याने शरीराची चयापचय शक्ती उत्तेजित होऊन वजन कमी व्हायला मदत मिळते.

यासोबतच अजून हि अनेक फायदे हे पाणी पिण्यामुळे होतात जसे कि हात पाय थरथरणे थांबत; दातदुखी दाढ दुखी पासून आराम मिळतो, रिकाम्या पोटी लवंगमिश्रित पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील विषद्रव्ये मुत्रावाटे बाहेर पडतात.

मात्र लवंग उष्ण गुणधर्म असणारी असल्याने आठवड्यातून एक ते दोन वेळाच हा उपाय करणे आपल्यासाठी हितकारक राहील. जास्त प्रमाणात आणि नियमित आपण लवंगमिश्रित पाणी पिऊ नका. आपल्याला “रिकाम्या पोटी लवंगमिश्रित पाणी पिण्याचे फायदे”  हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page