कोल्हापूरच्या रंकाळा तलावाचा फारसा माहीत नसलेला इतिहास माहिती आहे का?

रंकाळा तलावाचा इतिहास खूप जुना आहे म्हणजे इ. स. ८०० ते ९०० च्या कालावधीपासून याचा इतिहास आपल्याला पहायला मिळतो. रंकाळा तलावाला कोल्हापूरची चौपाटी असे म्हणतात आणि खूप पर्यटक ह्या ठिकाणाला आवर्जून भेट देतात.

पूर्वी या ठिकाणी दगडाची मोठ्ठी खाण होती आणि या खाणीतील दगडांचा वापर करून महालक्ष्मी मंदिर तसेच ३६० जैन मंदिरे बांधल्याचा उल्लेख इतिहासात दिलेला आहे. त्यांनतर ८ व्या ते ९ व्या शतकात इथे भूकंपाने याचा विस्तार मोठा झाला. या भूकंपांमुळे भूगर्भातील पाणी वाहू लागले. या पाण्यामुळेच येथे मोठा तलाव तयार झाला.

महालक्ष्मी मंदिरा पासून अर्धा कि. अंतरा वरती असलेल्या ह्या तलावाला ‘रंकाळा तलाव’ म्हणतात. हा सर्वात जुना तलाव आहे असे म्हणले जाते. भुत काळातील सर्वात मोठे नंदी असलेले ‘संध्या मठ’ मंदीर बांधले आहे. ह्यातील नंदीची मूर्ती सर्वात मोठी व जुनी आहे. ह्या तलावाच्या ऊत्तरेकडील टोकाला शालिनी पॅलेस आहे. दक्षिणेला पद्माराजे बाग आहे.

हा तलाव चित्रिकरणातील असल्यासारखा आहे त्यामुळे बरेचजण येथुन चालत जाण्याचा आनंद घेतात. ह्या तलावा मध्ये राजघाट व मराठा घाट ह्या दोन घाटातुन पाणी येते. राजघाटावरती टॉवर आहे. ह्या टॉवरच्या पुढच्या बाजुला शालिनी पॅलेस आणि आंबाई पोहण्याचा तलाव आहे.चित्रपट चित्रिकरणाकरिता हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. पावसाळ्यामध्ये ‘संध्या मठ’ जास्तीत जास्त पाण्यामध्ये येतो.

तर पुराण कथांनुसार शंकराचा अवतार व सोनारी गावचे ग्रामदैवत काळभैरव म्हणजेच काळभैरवनाथ हे शेषाची कन्या जोगुबाई ज्या जोगेश्वरी देवीचा अवतार असल्याची आख्यायिका आहे.

हिच्याशी विवाह करण्यासाठी पाताळात जात होते तेव्हा ते कोल्हापुरला अंबाबाईला भेटावयास आले. कारण पाताळात जाण्याचा रस्ता हा फक्त अंबाबाईला माहित होता. जेव्हा अंबाबाई काळभैरवनाथाला भेटण्यास आली व तिला त्याच्या येण्याचा उद्देश् कळाला. अंबाबाईने त्याला घोडा आणावयास सांगितले व रिंगणात डाव करावयास सांगितले.

घोड्याच्या टापांनी तिथे भला मोठा खड्डा तयार झाला. व या खड्यातून काळभैरवाने पाताळात जाऊन जोगुबाईशी विवाह केला. व पाताळातून परत आल्यावर परत कोणी पाताळात जाऊ नये म्हणून तो रस्ता काळभैरवाने बंद केला. व कालांतराने त्या खड्यात पाणी साचून पुढे त्याचे तळे निर्माण झाले.

या तलावाजवळच रंकभैरव या श्री महालक्ष्मी देवीच्या रक्षकाचे मंदिर आहे. त्यांच्या नावावरूनच या तलावास रंकाळा हे नाव पडले. शाहू महाराजांनी या तलावाचे रूपच बदलले.विविध प्रकारचे पक्षी, वनस्पती व सूर्यास्त पाहण्यास लोकांची गर्दी असते.

याचबरोबर रंकभैरव या शंकराचा अवतार समजल्या गेलेल्या व महालक्ष्मीच्या मर्जीतल्या देवाचे नाव या तलावाला देण्यात आलेले आहे असेही बोलले जाते. रंकाळा तलावाच्या उत्तरेला दगडी बांधकाम असलेले एक मंदिर आहे.

पावसाळ्यामध्ये हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जाते आणि पाणी कमी होईल तसतसे याला बेटाचे स्वरूप येते. येथे भगवान महादेवाचे आणि गणपतीचे मंदिर आहे, असे म्हणतात कि ब्रिटिश काळी या मंदिराचा वापर ब्रिटिश लायब्ररी म्हणून करायचे.

महालक्ष्मी मंदीराच्या पश्चिम दिशेला, रंकाळा तलाव आहे, सायंकाळी फिरण्यासाठी आणि करमणुकीचे लोकप्रिय ठिकाण आहे.हा तलाव राजा शाहु महाराज यांनी बांधला आहे. ह्या तलावाच्या सभोवताली चौपाटी व बाग आहे.

याच्या मागच्या बाजुला शालिनी पॅलेस आहे.हे महाराष्ट्रातील तारांकीत हॉटेल आहे. ही चौपाटी आपल्याला नेहमी चातक, भेलपूरी आणि रागडा पॅटीज आणि ईतर चांगल्या प्रकारच्या अन्न पदार्थांची आठवण करून देते.

पूर्वी कोल्हापूर हे शहर चित्रिकरणातील प्रसिध्द शहर आहे. पुष्कळ मराठी, हिंदी चित्रपठ कोल्हापूरातील चित्र गृहांमध्ये चित्रीत झाले आहेत. रंकाळा तलावाजवळ शांतकिरण चित्र गृहामध्ये बरेचसे चित्रपट चित्रित झाले आहेत. व्ही. शांताराम ह्यांचा हा स्वत:चा चित्रपट गृह, भारतीय चित्रपट सृष्टीला दिलेली भेट आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page