कोलेस्ट्रॉल म्हणजे चरबीसारखा एक पदार्थ असतो ज्याची निर्मिती आपल्या शरीरातील लिवरमध्ये होत असते. कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार असतात. एक असते चांगले कोलेस्ट्रॉल एचडीएल आणि दुसरे असते वाईट कोलेस्ट्रॉल एलडीएल.
एलडीएल आणि एचडीएल या दोन्ही कोलेस्टेरॉलची कामे वेगवेगळी असतात चांगले कोलेस्टेरॉल शरीराच्या आरोग्यास प्रोत्साहन देते तर खराब कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होऊन रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ शकतात.
शरीरात एलडीएल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यास हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. वाढलेल्या कोलेस्टेरॉलमुळे लठ्ठपणा तर वाढतोच शिवाय उच्च रक्तदाब समस्या देखील आपल्याला होऊ शकते.
म्हणूनच आज आपण शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवणाऱ्या अन्न पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांचे वजन वाढलेले आहे, शरीरात कोलेस्ट्रोल वाढलेले आहे त्यांनी तेलात तळलेले चिकन, मासे, अंड्याचा पिवळा बलक खाणे थांबवले पाहिजे.
अथवा महिन्यातून एखाद्या वेळी थोड्या प्रमाणात खाल्ले पाहिजे, ह्या पदार्थामध्ये चरबी वाढवणारे घटक मोठ्या प्रमाणात असतात. आईस्क्रीम, अतिगोड मिठाईचे सेवन केल्याने देखील आपल्या शरीरात कोलेस्ट्रोलचे प्रमाण वाढू शकते.
बेकरीमधील मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांमध्ये फायबर घटक नसतात ह्या अन्नपदार्थांचे नियमित सेवन केल्याने आपल्या शरीरात कोलेस्ट्रोलचे प्रमाण वाढू शकते.
पिज्जा, बर्गर, तळलेले पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट मोठ्या प्रमाणात असते. अशा पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्याने शरीरात कोलेस्ट्रोलचे प्रमाण वाढू शकते.
पनीर, चीज यामध्ये सॅच्युरेटेड फॅट मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे या पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन करू नका. आपल्यासाठी आम्ही नियमित महत्वपूर्ण माहिती पोस्ट करत असतो ती माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.