शरीरातील कोलेस्ट्रॉल पातळी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

आपल्या शरीरामध्ये एकूण कोलेस्टेरॉलची पातळी 200 mg/dl पेक्षा कमी असणे गरजेच असते. खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL जे 100 mg/dl पेक्षा कमी असाव आणि चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजेच HDL जे 60 mg/dl पेक्षा जास्त आणि ट्रायग्लिसराइड 150 mg/dl पेक्षा कमी असले पाहिजे.

निरोगी आरोग्यासाठी कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रणात असणे गरजेच असत. शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल पातळी प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यामुळे हृदयविकार, डायबेटीस, प्यारालीसीस, थायरॉईड वाढणे, किडनी खराब होणे, रक्तदाब कमी-जास्त होणे, लिवर खराब होणे असे आजार होण्याचा धोका असतो.

कोलेस्टेरॉल हा चरबीयुक्त पदार्थ असतो. जो आपल्या लिवर मध्ये तयार होत असतो. चांगले कोलेस्टेरॉल आपल्या शरीरामधील हार्मोन तयार करण्याचे काम करत असतात; सूर्याच्या प्रकाशाचे व्हिटॅमिन डी मध्ये रूपांतर करण्यासाठी, आपल्या शरीरातील विषारी द्रव्ये शोषून शरीर निरोगी ठेवण्यासाठी, आपल्या मेंदू चांगल्याप्रकारे काम करण्यासाठी गरजेच असत.

मात्र आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे, जास्त वेळ बैठे काम केल्यामुळे वाढलेल्या वजनामुळे, धावपळीच्या जीवनशैलीमुळे, मानसिक तणावामुळे, थायरॉईड वाढल्यामुळे आजकाल 30 वर्षे वय असणाऱ्यांची देखील कोलेस्टेरॉलची पातळी वाढताना दिसून येते.

म्हणूनच आज आपण शरीरातील कोलेस्ट्रॉल पातळी कमी करण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. नियमित चांगला आहार सेवन करून, शारीरिक व्यायाम करून आपण आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल पातळी कमी करू शकतो.

दररोज आवळ्याचे सेवन केल्याने अथवा ताज्या आवळ्यांचा ज्यूस प्यायल्याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी व्हायला मदत होते. सफरचंदांमध्ये असलेल्या पेक्टिन फायबर एन्टीऑक्सिडंट पॉलीफेनॉल या सारख्या पोषक घटकांमुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यासाठी आपण सफरचंदाचे सेवन करू शकता. अथवा कोमट पाण्यात 1 चमचा अपल सायडर व्हिनेगर मिसळून पिवू शकता.

आपल्या आहारामध्ये लिंबूवर्गीय फळे जसे कि संत्री, मोसंबी, लिंबू यांचा समावेश केल्याने कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. लिंबूवर्गीय फळांचा आहारात समावेश केल्याने रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो.

सकाळी 2-3 लसणाच्या पाकळ्या चघळल्याने कोलेस्टेरॉलची पातळी कमी व्हायला मदत मिळते. लसणामध्ये एलिसिन नावाचे कंपाऊंड असते जे नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्याचे काम करते. याशिवाय लसणाचे सेवन केल्याने रक्तदाब देखील नियंत्रित राहतो.

अक्रोडाचे सेवन केल्याने त्यामध्ये असणाऱ्या कॅल्शियम, मॅग्नेशियम, ओमेगा-३, फायबर, कॉपर आणि फॉस्फरस यांसारख्या पोषक घटकांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले कोलेस्टेरॉल वितळू लागते.

आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी सकाळी 30 मिनिटे कोवळ्या उन्हात चालायला जा, योगा करा, धावणे, पोहणे, सायकलिंग करणे, जिना चढणे यापैकी जे जमेल तो शारीरिक व्यायाम दररोज करा.

रोजच्या आहारातील तेलकट तळलेले पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ, मांसाहार, मैदायुक्त पदार्थ, अतिगोड पदार्थ त्वरित बंद करा. त्याऐवजी ताज्या भाज्या, पालेभाज्या, कडधान्य यांचा आहारात समावेश करा.

वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढून देऊ नका. कोलेस्टेरॉलमुक्त आयुष्य जगायचं असल्यास दररोज थोडा का होईना व्यायाम करायची सवय स्वताला लावा; आजपासूनच व्यायामाला सुरुवात करा. आपल्याला निरोगी आयुष्य मिळो!

आपल्याला शरीरातील कोलेस्ट्रॉल पातळी कमी करण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. कोणताही उपाय करण्याआधी आपल्या फॅमिली डॉ चा सल्ला अवश्य घ्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page