उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी 5 प्रभावी मार्ग

सोप्या भाषेत सांगायचे तर कोलेस्टेरॉल म्हणजेच रक्तात आढळणारी चरबी कोलेस्टेरॉल हा लिपिडचा एक प्रकार आहे. कोलेस्टेरॉल हा एक मेणासारखा, चरबीसारखा पदार्थ आहे जो आपल्या यकृतात नैसर्गिकरित्या तयार होतो. आपल्या शरीरात हार्मोन्स तयार होण्यासाठी, व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी कोलेस्टेरॉल गरजेच असत.

कोलेस्टेरॉल पाण्यात विरघळत नसल्यामुळे ते आपल्या रक्तात मुक्तपणे फिरू शकत नाही. आपले यकृत कोलेस्टेरॉल वाहतूक करण्यास मदत करण्यासाठी लिपोप्रोटीन तयार करते. लिपोप्रोटीन नावाचे कण प्रथिने आणि चरबीपासून बनलेले असतात. ते ट्रायग्लिसराइड्स, लिपिडचा एक वेगळा प्रकार असतात आणि ते कोलेस्टेरॉल रक्तप्रवाहातून वाहून नेतात.

कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार असतात. 1)Low-density lipoprotein (LDL) 2) high-density lipoprotein (HDL) कमी-घनतेच्या लिपोप्रोटीनद्वारे वाहतुक केलेल्या कोणत्याही कोलेस्टेरॉलला एलडीएल कोलेस्ट्रॉल म्हणतात. शरीरात असणाऱ्या रक्तात एलडीएल कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असल्यास या स्थीतीला उच्च कोलेस्टेरॉल आहे असे म्हणता येईल.

आपल्या शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढलेले असल्यास त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तसेच शरीरात कोलेस्ट्रोलचे प्रमाण वाढलेले असल्यास त्यामुळे  प्यारालीसीस अर्थात पक्षाघात यांसारख्या अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मटन, मांस, फास्ट फूड, इन्स्टंट फूड खाणे थांबवा. आइस्क्रीम, कोल्ड्रिंक, मैद्याचे पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी करा.

विद्राव्य फायबर घटक असणाऱ्या अन्न पदार्थांचे सेवन वाढवा. विरघळणारे फायबर शरीरातील कोलेस्टेरॉलचे शोषण करण्यासाठी उपयोगी असतात. फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य यांसारखे उच्च फायबर असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश असू द्या.

धूम्रपानामुळे तुमच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि तुमचे रक्त घट्ट होते आणि ऑक्सिजन पुरवण्यास कमी होते. तुमच्या हृदयाला अधिक काम करण्याची गरज आहे, तुमच्या शरीरातून रक्त तितक्या सहजतेने वाहू शकत नाही आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात, परिणामी हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक होऊ शकतो.

धूम्रपान केल्यामुळे LDL कोलेस्टेरॉल चिकट बनते. त्यामुळे ते आपल्या धमन्याना चिकटून राहते आणि त्यामुळे धमन्या कमकुवत होतात. धू’म्रपानामुळे एचडीएल कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते.

धु’म्रपान बंद केल्याने हृदयविकाराचा आणि इतर अनेक आरोग्य समस्यांचा धोका कमी होऊ लागतो. आपला श्वासोच्छ्वास अधिक मोकळा होतो, आपल्याला अधिक तंदुरुस्त आणि निरोगी वाटू लागेल, तसेच आपली त्वचा चांगली दिसेल, आपला ताणतणाव कमी होईल.

कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी शारीरिक हालचाल वाढवा आणि नियमित व्यायाम करा कारण यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होईल. आपल्याला उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी 5 प्रभावी मार्ग हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा; अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page