कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याची लक्षणे

गेल्या काही वर्षांपासून हृदयविकाराच्या घटना वाढत असल्याचे आपण बघतोय. जगभरात हृदयविकारामुळे अनेक जण जीवाला मुकले आहेत. शरीरात वाईट कोलेस्ट्रोलचे प्रमाण वाढल्यामुळे हृदयविकार होण्याचा धोका असतो. खराब कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक तयार होऊन अडथळे निर्माण होऊ शकतात. आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

आज आपण शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढलेली असल्यास कोणकोणती लक्षणे दिसून येतात हे जाणून घेणार आहोत. बराच वेळ एकाच जागी बसून काम केल्यावर हाता पायांना मुंग्या येणे; हात पाय बधीर होणे, पाय थंड पडणे.

थोड चालल तरी पाय दुखायला लागतात. थोड काम केल तरी लगेच दम लागणे, अत्याधिक घाम येतो, अचानक वजन वाढू लागत, रक्तदाब वाढतो. या पैकी जर आपल्याला एका पेक्षा जास्त लक्षणे जाणवत असतील तर आपण डॉक्टरांची भेट घेऊन आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य आहे की नाही याची तपासणी करू शकता.

आपल्या शरीरात वाईट कोलेस्टेरॉलप्रमानापेक्षा जास्त झाले तर हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा धोका जास्त असतो. म्हणूनच वेळीच सावध होऊन आपले वजन नियंत्रित ठेवा, चांगल्या गोष्टी खा.

शरीरातील वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी मांसाहार करणे कमी करा, म’द्यपान करू नका, बाहेरच खाण बंद करा विशेषत मैद्याचे पदार्थ खाणे थांबवा, अतिगोड खाणे, तेलकट खाणे बंद करा. दररोज किमान 30 मिनिटे शारीरिक व्यायाम करा. सायकल चालवा, चालायला जा, कार्डीओ करा, पोहायला जा, योगा करा.

आपल्याला कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याची लक्षणे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. माहिती चांगली वाटल्यास पोस्ट शेयर करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page