कोकणातील गूढ कातळशिल्प माहिती

वेगवेगळ्या ठिकाणांना भेट दिल्यानंतर आपल्या तिथे वेगवेगळी शिल्पे दिसत असतात परंतु त्यांचा नेमका अर्थ आपल्याला माहित नसतो. आज अशाच काही कातळशिल्पांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत हि कातळशिल्पे आपल्याला कोकणात पहायला मिळतात.

महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात भले मोठे कातळशिल्प पाहायला मिळते. संगमेश्वर पासून जवळच असलेल्या उक्षी या गावात अशी कातळशिल्पे आहेत. संशोधकांच्यामते ही शिल्पे साधारणपणे 10 हजार वर्षे जुनी असावी.

प्राचीन काळाची ओळख पटवून देणारी ही शिल्प आपल्याला महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पहायला मिळतात. जगभरात अशा शिल्पांना रॉक आर्ट म्हणून ओळखले जाते.

रत्नागिरी जिल्ह्यात असणारे हत्तीचे कातळशिल्प हे अत्यंत चांगल्या पद्धतीने कोरून बनवण्यात आलेल आहे. या शिल्पावरून आपण त्याकाळातील जीवनशैलीचा अंदाज बांधू शकतो.

पुर्ण बारकाव्यांनिशी कोरलेल हे कातळशिल्प मानवाच्या कलात्मक उत्क्रांतीच्या हा एक सुंदर नमुना आहे. हि कातळ शिल्प बनवणाऱ्या शिल्पकाराने साकारलेल्या या कलाकृतीतून त्याकाळी हत्ती हा त्यांच्या नित्य परिचयाचा प्राणी असावा असा अंदाज आपण बांधू शकतो.

या कातळशिल्पाची लांबी 20 फूट आणि उंची 16 फूट रुंद इतकी आहे. या शिल्पापासून जवळ असलेल्या अनेक गावात अशी छोटी मोठी शिल्पे आढळलेली आहेत. कोरीव शिल्पकलेचा उत्तम नमुना असणारी अशी जवळजवळ 950च्या आसपास कातळशिल्पे रत्नागिरी सह सिंधुदुर्ग, ठाणे, चिपळूण, रायगड याठिकाणी आढळली आहेत.

या शिल्पात विविध प्राणी, पक्षी आणि त्या काळातील जीवन संस्कृतीचे दर्शन होत. ही शिल्पे का निर्माण केली असावीत याचा अंदाज व्यक्त करता येत नाही. इतक्या मोठ्या संख्येने आढळणारी ही शिल्पे कोकणात गेल्यावर आपल्याला बघायला मिळतो. आपण सर्वांनी हा अनमोल खजिना जपला पाहिजे.

सध्या लोकसहभागातून ह्या  शिल्पांना उजाळा देण्याचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे जगभरातील पर्यटक हि कातळशिल्प पाहण्यासाठी येत आहेत. कदाचित त्याकाळात माणस  स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी अशी शिल्पे कोरत असतील.

या कातळशिल्पांबद्दल आपल्याकडे अधिक माहिती असेल तर आम्हाला ती कमेंट करून नक्की सांगा. आपण अशी कातळशिल्प अजून कुठे बघितली असतील तर आम्हाला कमेंटकरून सांगा.

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेजमध्ये कळवा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page