उन्हाळ्यात दररोज 1 ग्लास कोकम सरबत प्यायल्याने मिळणारे आश्चर्यकारक फायदे

उन्हाळ्यात शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी, शरीराला थंडावा आणि स्फूर्ती मिळण्यासाठी आपण कोकम सरबत सेवन करू शकता. कोकमचा वापर मुख्यत स्वयंपाक घरात आमटी बनवताना केला जातो. कोकण किनारपट्टी लगतच्या परिसरामध्ये असणाऱ्या जंगलामध्ये रातांब्यांची झाड आपल्याला पाहायला मिळतात.

कोकम हा रातांबे हे फळ सुकवून कोकम बनवले जाते. कोकम हे चवीला आंबट असले तरी पित्तशामक असत. कोकम सरबत प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि एसिडीटी यांसारख्य़ा समस्या दूर होण्यास मदत होते.

कोकममध्ये एंटीऑक्सिडंट्स, बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन, व्हिटॅमिन सी,  कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम असे शरीराला आवश्यक पोषक घटक असतात.

कोकम सरबत बनवण्यासाठी कोकम पाण्यात भिजायला ठेवा. त्यानंतर भिजवलेले कोकम पाण्यात कुस्करून ते पाणी गाळून घ्यावे. त्यात जिरेपूड आणि साखर घाला. अशा प्रकारे आपले कोकम सरबत तयार होईल.

नियमित कोकम सरबत प्यायल्याने शरीरावरील शीतपित्त दूर होईल. उन्हाळ्यात नियमित कोकम सरबत प्यायल्याने प्यायल्याने त्वचा मुलायम, तजेलदार होते.

कोकम सरबतामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असे घटक असतात; कोकम सरबत प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. कोकम सरबत प्यायल्याने थायरॉईड हार्मोन्स संतुलित राहायला मदत मिळते.

कोकम सरबतामुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते; बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यासाठी आपण कोकम सरबत पिवू शकता. उन्हामुळे तळपायांची आग होणे, शरीराची काहीली होणे असे उष्णतेचे त्रास कमी होण्यासाठी आपण कोकम सरबत पिवू शकता.

नियमित कोकम सरबत पिल्याने कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. कोकम सरबतामध्ये असणारा हायड्रो क्रिटिक असिड हा घटक आपल्या शरीरातील प्रतिकारक्षमता वाढवून वजन कमी करण्यास मदत करतो.

कोकम सरबत  नियमित प्यायल्याने सकाळी पोट व्यवस्थित साफ होते. आपल्याला कोकम सरबत प्यायल्याने मिळणारे आश्चर्यकारक फायदे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page