8 दिवस रोज एक किवी फळ खाल्याने मिळतील आश्चर्यकारक फायदे

दिसायला चिकू सारखे आणि चवीला तुरट, आंबट असणारे किवी हे फळ बाजारात वर्षभर उपलब्ध असते. खरतर हे फळ विदेशी आहे मात्र सध्या भारतामध्ये याची शेती बऱ्याच ठिकाणी केली जाते. म्हणूनच हे फळ बाजारात वर्षभर उपलब्ध असते. आज आपण किवी हे फळ खाल्याने आपल्याला कोणकोणते फायदे मिळू शकतात याविषयी जाणून घेणार आहोत.

किवीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, एंटिऑक्सिडेंट, लोह, पोटॅशियम आणि फायबर हे पोषक घटक असतात. किवी फळ खाल्ल्याने त्यामध्ये असणाऱ्या एंटिऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन सी या पोषक घटकांमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

नियमित किवी फळ खाल्याने सांधेदुखी, हाडांचे दुखणे कमी होते. किवी फळ खाल्ल्याने त्वचा चमकदार होते आणि सुरकुत्या दूर होतात. किवी फळ खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहायला मदत मिळते.

किवीचे सेवन केल्याने पांढऱ्या रक्तपेशी वाढायला मदत होते म्हणूनच बऱ्याचदा रक्तातील पांढऱ्या पेशी कमी झाल्यावर डॉक्टर किवी खाण्याचा सल्ला देतात.

किवीमध्ये कॅलरीज खूप कमी असतात, त्यामुळे आपण वजन कमी करायचा विचार करत असाल तर आपल्या डायटमध्ये किवीचा समावेश नक्की करा. सकाळी किवीचे सेवन केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडायला मदत मिळते.

पचनसंस्था चांगली राहण्यासाठी आपण किवीचे सेवन करू शकता. आपल्याला किवी हे फळ खाल्याने कोणकोणते फायदे मिळू शकतात हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page