किल्यांवरील ह्या दगडी वास्तूचा वापर नेमका कोणत्या कारणासाठी केला जायचा?

आज नेहमीप्रमाणे आम्ही आपल्यासाठी काही खास ऐतिहासिक माहिती घेऊन आलो आहोत. जर आपल्याला आमच्या पोस्ट वाचायला आवडत असतील तर शोध इतिहासाचा हे आमचे फेसबुक पेज लाईक करून ठेवा.

छत्रपती शिवरायांनी बांधून घेतलेल्या किल्ल्यांना भेट देत असताना. आपल्याला किल्ल्यावर असणाऱ्या शिवकालीन वास्तू, मंदिरे, किल्याभोवतालचा परिसर, किल्यावर घडलेल्या ऐतिहासिक घटना, किल्यावर असणाऱ्या झाडांची, किल्यावरील पशु आणि प्राण्यांची माहिती असणे गरजेच असत.

हि माहिती आपल्याला असली कि किल्ला बघण्याचा आपला आनंद द्विगुणीत होतो. आज आपण अश्याच एका शिवकालीन वास्तूबद्दल अधिक माहिती घेणार आहोत.

छायाचित्रात दिसणाऱ्या दगडी वास्तूला चुन्याचा घाणा असे म्हणतात. किल्ले बांधकाम कार्यामधील सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे चुना. शिवकाळात किल्ल्यांच्या बांधकाम कार्यासाठी चुन्याचा वापर केला जायचा. ह्या घाण्याचा वापर चुना दळण्यासाठी केला जायचा.

ह्या घाण्याच्या चरामध्ये चुनखडी, वाळू, गुळाचे पाणी , भाताचे तूस, मेथीच्या बिया, बेलफळ आणि पाणी असे पदार्थ एकत्र करून टाकले जायचे आणि मग बैलांच्या मदतीने हा घाणा चालवून हे सगळे पदार्थ एकजीव केले जायचे.

अशा पद्धतीने तयार करण्यात आलेल्या चुन्याच्या सिमेंटचा (सिमेंट ह्या शब्दाचा मराठी अर्थ किंवा पर्यायी शब्द आपल्याला माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा) वापर किल्ले बांधणीसाठी आणि दुरुस्तीसाठी केला जायचा.

अशा प्रकारचा जुना शिवकालीन चुन्याचा घाणा आपल्याला किल्ले तिकोना, वसंतगड, विसापूर, विजयदुर्ग, रोहिडा ह्या किल्ल्यावर पाहायला मिळू शकतो.

आपल्याला हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page