किडनी आपल्या शरीरातील महत्वपूर्ण अवयव आहे. किडनी हि आपल्या मणक्याच्या दोन्ही बाजूंना कमरेच्या थोड्या वरच्या बाजूला असतात. किडनी ह्या आपल्या शरीरातील नैसर्गिक फिल्टर असतात. शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर टाकण्याचे काम किडनी करत असते. आपल्या शरीरातील रक्त शुद्धीकरण करण्याचे कार्य किडनी करत असते.
रक्तशुद्धीकरणा सोबतच किडनी आपल्या शरीरातील क्षारांचे प्रमाण संतुलित ठेवण्याचेसुद्धा काम करते. जर किडन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अशुद्धी निर्माण झाल्या तर वेगवेगळ्या प्रकारचे किडनीचे आजार होण्याचा धो’का असतो.
म्हणूनच वेळोवेळी आपण किडनीमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढली पाहिजे यासाठी आपण आज जाणून घेणार आहोत. किडनीमध्ये जमा झालेली घाण काढण्यासाठी काही घरगुती उपाय
किडनीमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये राजमा चा समावेश करू शकता. राजमामध्ये व्हिटामिन बी, फायबर आणि अनेक खनिजे असतात. राजमाचा आहारात समावेश केल्याने आपली किडनी स्वच्छ होते.
किडनीमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढण्यासाठी तीन ते चार पानफुटीच्या पानाचा रस सकाळी रिकाम्या पोटी आठ दिवस प्या. हा उपाय केल्याने आपल्या किडनी मध्ये जमा झालेले सगळे अशुद्ध घटक लघवीवाटे बाहेर पडतील.
किडनीमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढण्यासाठी आपण डाळींबाचा रस पिऊ शकता. डाळींबामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते. ज्यामुळे आपल्या किडनी मध्ये जमा झालेली अशुद्धी बाहेर निघण्यास मदत मिळते.
किडनीमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढण्यासाठी महिन्यातून दोन वेळा एक ग्लास पालकचा रस प्या. पालकमध्ये असणारी अँटीऑक्सिडंट्स आपल्या किडन्यांना डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात.
ह्या उपायासोबातच पाणीसुद्धा आपल्या शरीरातील अशुद्धी बाहेर काढण्याचे कार्य करतात. म्हणूनच दिवसभरात पुरेशे पाणी प्या. आपल्याला किडनीमध्ये जमा झालेली घाण काढण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा; अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.