किडनी खराब होण्याआधी शरीरात हि लक्षणे दिसून येतात

कि’डनी हा आपल्या शहरातील एक महत्त्वाचा अवयव आहे जी आपल्या शरीरातील नको असलेले पदार्थ मू’त्रमार्गातून शरीरात साठलेला यू’रिया, क्रिएटिनिन आणि इतर अनेक हा’निकारक पदार्थांना काढून ल’घवीद्वारे बाहेर टाकण्याचे कार्य करत असतो.

कि’डनी आपल्या शरीरातील रक्ताची स्वच्छता करण्याचे कार्य करत असते. खराब जीवनशैलीमुळे आपल्याला बऱ्याच आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. कि’डनी रोग होण्याआधी सुरुवातीला शरीरामध्ये कोणकोणती लक्षणे दिसून येतात हे आज आपण जाणून घेणार आहे.

चालताना किंवा पायऱ्या चढताना अचानक थकवा जाणवणे, थोड चाललं तरी अशक्तपणा आल्यासारखे वाटत असल्यास हे किडनी नीट काम करत नसल्याचे लक्षण आहे.

कमी किंवा जास्त ल’घवीला येणे हे किडनीच्या आजाराचे सर्वात महत्वाचे लक्षण आहे. किडनी सबंधित आजार होण्याआधी हे लक्षण दिसून येते. आपल्याला ल’घवी करत असताना जळजळ होत असल्यास त्यामुळे मू’त्रमार्गात संसर्ग होण्याची दाट शक्यता असते.

किडनी आपल्या शरीरातील अतिरिक्त पाणी, मीठ आणि इतर हानिकारक पदार्थ काढण्याचे कार्य करत असते. हे कार्य योग्यप्रकारे न झाल्याने शरीरात अतिरिक्त पाणी वाढते, ज्यामुळे संपूर्ण शरीराला सुज येण्याची शक्यता असते. विशेषता हात, पाय, चेहरा यांना सकाळी सूज येत असल्यास आपण जवळच्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधला पाहिजे.

जर आपल्या लघवीमधून जास्त फेस येत असेल तर याचा अर्थ तुमच्या लघवीतून शरीरातील जास्त प्रथिने बाहेर पडत आहेत. अशावेळी आपण जवळच्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधला पाहिजे. जर आपल्या डोळ्यांखाली नियमित सूज येत असल्यास तर ते किडनी खराब होण्याचे लक्षण देखील असू शकते.

शरीरातील रक्तामध्ये अशुध्द पदार्थ राहिल्याने बऱ्याचदा मळमळ आणि उल्टी येण्याची शक्यता असते. आपल्यास पोटाच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला असह्य वेदना होत असल्यास ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका कारण ते किडनी निकामी झाल्याचे लक्षण असू शकते.

काहीही खाण्याची इच्छा न होणे, भूक न लागणे, अचानक वजन कमी होणे, रात्री झोप न लागणे ही सुद्धा किडनीच्या आजारांची लक्षणे आहेत. अशी लक्षणे आपल्या शरीरात दिसत असल्यास आपण जवळच्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधला पाहिजे. आपल्याला लघवीमधून रक्त येत असल्यास अशा परिस्थितीत आपण त्वरित एखाद्या यूरोलॉजिस्टला भेटले पाहिजे.

आपल्याला किडनी खराब होण्याआधी शरीरात कोणकोणती लक्षणे दिसून येतात हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा; अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.

वरती दिलेल्या माहितीमध्ये कोणतेही बदल सुचवायचे असल्यास आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page