केसांमधील उवा घालवण्यासाठी घरगुती उपाय

आपल्यापैकी काही महिलांना, मुलींना केस गळतात म्हणून आठवड्यातून एकदा केस धुवायची सवय असते. आठवड्यातून एकदा केस धुतल्याने केसांमध्ये धूळ, माती, जास्त प्रमाणात जमा होते तसेच केसांमध्ये कोंडा होणे, केसांमध्ये गुंता होणे, केस चिकट होणे, उवा होणे अशा समस्या होऊ शकतात. आज आपण केसांमध्ये होणाऱ्या उवा बद्दल अधिक माहिती घेणार आहोत. उवांनाच हिंदीमध्ये जूँ  असे म्हणतात.

उवा ह्या आकाराने अगदी लहान अश्या परजीवी कीटक असतात ते आपल्या शरीरातील रक्त पिऊन त्यांचा उदरनिर्वाह करतात. केसांमध्ये उवा झाल्यास डोकेदुखी, खाज सुटणे आणि त्वचेचा संसर्ग होऊ शकतो म्हणून वेळीच काळजी घेणे गरजेच आहे. म्हणूनच आज आपण केसांमधील उवा घालवण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

केसांमधील उवा निघून जाण्यासाठी रात्री झोपताना कडुलिंबाचे तेल केसांना लावून मग झोपावे आणि सकाळी कोमट पाण्याने केस धुवावेत. असे केल्याने केसांमधील उवा निघून जातात. कडुलिंबाचे तेल आपल्या मेडिकलमध्ये मिळू शकते. केसांच्या मुळाशी लसणाचा रस लावल्याने देखील केसांमधील उवा निघून जायला मदत होते.

केसांमधील उवा निघून जाण्यासाठी आपण केसांच्या मुळाशी लिंबाचा रस लावू शकता; लिंबाच्या रसामध्ये असणाऱ्या आम्ल गुणधर्मामुळे केसांमधील उवा निघून जातात.

रात्री झोपायच्या आधी केसांच्या मुळाशी एरंडेल तेल लावा; सकाळी झोपेतून उठल्यावर बारीक दाताच्या कंगव्याने किंवा फणीने केस विंचरा आपल्या केसांमध्ये असणाऱ्या सगळ्या उवा निघून जातील.

केसांमध्ये उवा होणे हे संसर्गजन्य असते त्यामुळे आपल्या घरातील एखाद्या सदस्याच्या केसांमध्ये उवा झाल्यास त्याचा टॉवेल, कंगवा, त्याचे कपडे अशा गोष्टी इतरांनी वापरू नये.

आपल्याला केसांमधील उवा घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा; ह्या माहितीविषयी आपल्या प्रतिक्रिया वाचण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page