केसांमध्ये चिकटपणा होणे, केसांमध्ये गुंता होणे घरगुती उपाय

महिलांना त्यांच्या केसांसंबंधी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषत: लांब केस असलेल्या महिलांना केसांच्या खुप समस्या येतात. त्यातलीच एक म्हणजे केसांमध्ये खुप घाम येऊन केस चिकट होणे आणि खाज येणे.

यासोबतच घामामुळे केसांना खूप वास येणे. अशा परिस्थितीत केसांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र काही वेळा अनेक गोष्टी करूनही महिलांना या समस्येला सामोरे जावे लागते.

केस चिकट होण्याचे एक कारण म्हणजे डोक्यावर केसांमध्ये जमा होणारी घाण आणि दुसरे कारण म्हणजे तुमच्या त्वचेच्या ग्रंथी जास्त प्रमाणात तेल तयार करतात.

चिकट केसांमुळे त्यांच्यावर धूळ आणि माती जास्त साचते, ज्यामुळे त्वचेचे आजार आणि कोंड्याची समस्या देखील होऊ शकते. ही समस्या तुम्हाला ही असेल तर आज आपण यावर घरगुती उपचार काय करता येतील ते जाणून घेणार आहोत.

केसांचा चिकटपणा घालवण्यासाठी आपण अंड्याच्या बलकाचा वापर करू शकता. अंड्याचा पिवळा भाग काढून त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकून पेस्ट बनवा. हातांमध्ये रबरी ग्लोव्ज घालून हि पेस्ट आपल्या केसांच्या मुळाशी लावा.

साधारण 15 मिनिटे राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने केस धुवा. असे केल्याने केसांमधील चिकटपणा कमी होऊन आपले केस मऊ आणि रेशमी होतील.

आठवड्यातून एकदा गुलाब पाण्याने केस धुतल्याने केस सुगंधी आणि सुंदर होतात. केसांचा चिकटपणा कमी होतो. केसांचा चिकटपणा घालवण्यासाठी केस मऊ आणि सुंदर होण्यासाठी केसांच्या मुळाशी कोरफड जेल लावून मालिश करा. कोरफड जेलमध्ये असणाऱ्या पोषक घटकांमुळे केस मऊ होतात.

आपल्याला केसांमध्ये चिकटपणा होणे, केसांमध्ये गुंता होणे घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगा, आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक लाईक/ फॉलो करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page