केसांना कांद्याचा रस लावल्याने होणारे फायदे

आपले केस घनदाट आणि सुंदर असावे अस प्रत्येक स्त्रीला वाटत असत. आपले केस दाट आणि सुंदर होण्यासाठी आपण केसांच्या मुळाशी कांद्याचा रस लावू शकता. केसांना कांद्याचा रस लावल्याने अनेक महिलांना फायदा झालेला आहे. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत; केसांना कांद्याचा रस लावल्याने होणारे फायदे.

कांद्याच्या रसामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावल्याने केसांमध्ये कोंडा होण्याचे प्रमाण कमी होते. कांद्याच्या रसामध्ये सल्फर असते. कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावल्याने केस मजबूत होतात. आपले केस गळत असल्यास आपण हा उपाय करू शकता.

कांद्याचा रस लावल्याने टाळूमध्ये रक्ताभिसरण सुधारून केस वाढण्यास मदत होते. केसांना कांद्याचा रस लावल्याने केस चमकदार आणि दाट होतात. आपल्याला लांब केस हवे असल्यास आठवड्यातून 2 वेळा कांद्याचा रस आणि नारळाचे तेल एकत्र करून केसांच्या मुळाशी लावा.

15 मिनिटे राहूद्या आणि नंतर शाम्पूने केस धुऊन टाका. असे केल्याने केसांची चांगली वाढ होते. कांद्याचा रस केसांना लावल्याने येणारा तीव्र वास घालवण्यासाठी शाम्पू केल्यानंतर केसांवर थोडेसे गुलाबजल लावा. कांद्याचा रस पहिल्यांदा लावताना डोक्याच्या फक्त काही भागावर लावून बघा. आपल्याला कांद्याचा रस लावल्याने फायदा झाला तर इतर भागावर लावा.

आपल्याला केसांना कांद्याचा रस लावल्याने होणारे फायदे हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा;  अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page