जेव्हा आपल्या केसांचे शेंडे दोन भागात विभागले जातात त्याला फाटे फुटणे असे म्हणतात. केसांना फाटे फुटले कि, केस निर्जीव, कोरडे दिसू लागतात. केसांना फाटे फुटल्यास केसांची वाढ खुंटते. बहुतेक स्त्रियांना केसांना फाटे फुटण्याची समस्या असते.
केमिकल युक्त शाम्पूचा अती वापर, धूळ, प्रदूषण, तीव्र सूर्यप्रकाशात काम केल्यामुळे केसांना फाटे फुटत असतात. केसांना फाटे फुटू नये म्हणून आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
केसांसाठी शाम्पू निवडताना सौम्य आणि नैसर्गिक घटक युक्त शाम्पू निवडा. केसांना शाम्पू करण्याआधी अर्धा तास केसांना नारळ तेलाने मालिश करा. नियमितपणे असे केल्यास केसांना फाटे फुटत नाही.
केसांना फाटे फुटत असतील तर एक चांगली पिकलेली पपई घ्या. तिचा काही भाग मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. या पेस्टमध्ये ताजे दही मिसळून चांगले एकजीव पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांच्या त्वचेवर व केसांना लावा. अर्धातासाने सौम्य शॅम्पूने केस धुवा. महीन्यातून एकदा हा प्रयोग करा. असे केल्यास केसांना फाटे फुटत नाही.
केसांचे फाटे कमी करण्यासाठी मेथीदाणे फार लाभदायक आहेत. चार चमचे दह्यात मेथीचे दाणे अर्धा तास भिजवून नंतर हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्या हे मिश्रण केसांना साधारण अर्धा तास लावून ठेवा. नंतर केस कोमट पाण्याने धुवा. असे केल्याने केसांना आलेला कोरडेपणा जाऊन फाटे निघून जातील आणि केस मुलायम होतील.
केसांना फाटे फुटत असतील त्यावर अंड्याचा पिवळा बलक लावा. अंड्यात प्रथिने आढळतात. केस मुळापासून मजबूत करण्यासाठी आपण अंड्याचा वापर करू शकता. अंड्याचा बलक केसांना लावल्याने केसांचे कंडीशनिंग होते, आणि केस मजबूत होतात. केसांना फुटलेले फाटे निघून जातात.
चांगल्या केसांसाठी योग्य आणि पोषक आहार आवश्यक आहे. पालेभाज्या, फळे, बदाम, मासे, नारळ इत्यादी आपल्या आहारात असतील तर केस चांगले राहतील. आपल्याला केसांना फाटे फुटणे घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.