केसांना फाटे फुटत असतील तर हे सोपे घरगुती उपाय करून पाहा

आपले केस दाट आणि काळेभोर असावे अस प्रत्येक महिलेला वाटत असत. केसांची मजबुती हि आपल्या जीवनशैलीवर  आणि आपण घेत असलेल्या आहारावर अवलंबून असते. आजकाल जवळपास सगळ्याच महिला केस धुण्यासाठी केमिकल युक्त शाम्पूचा वापर करतात.

केमिकल युक्त शाम्पूच्या अति वापरामुळे आपले केस कोरडे पडतात, केसांच्या मुळाशी फाटे फुटू लागतात. केसांना फाटे फुटू लागले कि केसांची वाढ खुंटते, केस रुक्ष दिसू लागतात. म्हणूनच आज आपण केसांना फाटे फुटणे यावरील घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

आपल्या केसांना फाटे फुटले असतील तर केसांची टोके 1 ते 2 इंचापर्यंत कैचीने कापून टाका. असे केल्याने आपले केस वेगाने वाढायला लागतील आणि केसांना फाटे देखील फुटणार नाही. कोरफड गरामध्ये लिंबाचा रस मिसळून आपल्या केसांवर 30 मिनिटे लावल्याने कोरडे झालेल्या केस परत पहिल्यासारखे मुलायम होतील.

अंड्यांमध्ये असलेले प्रोटीन केसांसाठी खूप चांगले असते. आपल्या केसांवर आठवड्यातून एकदा अंड्याच्या पांढऱ्या बलकाचा मास्क लावा. असे केल्याने केसांना फाटे फुटणार नाही; केस मऊ मुलायम होतील. बऱ्याचदा केसांना कलर केल्यानंतर केस कोरडे पडून तुटू लागतात त्यामुळे केसांवर कोणत्याही प्रकारचे कलर करू नका.

बऱ्याचदा केस कोरडे झाल्यामुळे केसांना फाटे फुटायला लागतात. केसांना फाटे फुटू नये यासाठी केस धुतल्यानंतर कंडिशनर लावा. आपल्याला केसांना फाटे फुटत असल्यास कोणकोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. कोणताही उपाय करण्याआधी आपल्या फॅमिली डॉ चा सल्ला अवश्य घ्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page