डिलिव्हरी नंतर होतेय केस गळती? जाणून घ्या घरगुती उपाय

महिलांच्या शरीरात ग’र्भधारणेदरम्यान अनेक हा’र्मोनल बदल होत असतात. ग’र्भधारणेदरम्यान बऱ्याचश्या स्त्रियांचे केस दाट, काळे चमकदार होतात. मात्र डिलिव्हरी नंतर केस गळायला देखील लागतात. प्रसूतीनंतर महिलांमध्ये इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी होऊ लागते, त्यामुळे केस गळण्याची समस्या उद्भवते.

आई झाल्यावर बाळाला सांभाळण्याची जबाबदारी आणि त्यात अचानक सुरु होणाऱ्या केस गळतीमुळे नवीनच आई झालेल्या स्त्रियांना मानसीक तणावाचा सामना करावा लागतो. आज आपण डिलिव्हरी नंतर केस गळतीवर घरच्याघरी काय उपाय करता येतील ते जाणून घेणार आहोत.

केसांशी संबंधित सर्व समस्यांसाठी मेथी खूप फायदेशीर मानली जाते. प्रसूतीनंतर तुमचे केस गळायला लागले असतील तर दोन ते तीन चमचे मेथीदाणे एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा.

सकाळी हे पाणी गाळून केसांना लावा आणि काही तास तसंच राहू द्या. त्यानंतर सौम्य शाम्पूने केस धुवा. असे केल्याने तुम्हाला लवकरच फरक दिसेल.

जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर केस गळणे थांबवण्याचा हा उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला फक्त एक अंडे घ्यायचे आहे आणि त्याचा पांढरा भाग काढून टाकायचा आहे.

त्यात 3 चमचे ऑलिव्ह तेल घाला. हा हेअर पॅक अर्धा तास केसांवर ठेवा आणि नंतर थंड पाण्याने केस धुवा.यामुळे केस आणि टाळूचे पोषण होईल आणि तुमचे केस मऊ आणि मजबूत होतील.

केसांच्या पोषणासाठी आवळा खूप फायदेशीर आहे. तुम्ही त्याचा जेवणात समावेश करा. तुम्ही त्याचा रसही पिऊ शकता. तसेच ताजे आवळाही केसांना लावू शकता.याने नक्कीच फरक पडेल.

प्रसूती नंतर केस गळण्याच्या समस्येने तुम्ही हैराण असाल तर केसांमध्ये दही लावा. वास्तविक दही केसांसाठी कंडिशनर म्हणून काम करते आणि केसांमध्ये ओलावा टिकवून ठेवते.

दही लावल्याने केस मजबूत होतात आणि त्यांची वाढही चांगली होते. यासाठी केसांमध्ये दही लावा आणि १५ ते २० मिनिटे राहू द्या. यानंतर केस शॅम्पूने धुवा. आठवड्यातून एक किंवा दोनदा असे केल्याने तुमचे केस गळणे थांबेल.

प्रसूतीनंतर स्तनपान करणाऱ्यांना महिलांनी आपल्या रोजच्या आहारावर विशेष लक्ष द्यावे; आपला आहार चांगला असेल तर केस गळणे थांबवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे केमिकल युक्त औषध घेण्याची गरज नाही.

आपल्याला मांड्याना, काखेत, खाज, खरुज, गजकर्ण, नायटा त्वचा रोगांवर घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. कोणताही उपाय करण्याआधी आपल्या फॅमिली डॉ चा सल्ला अवश्य घ्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page