हार्मोन्स बदलामुळे केस गळत असतील तर करा हा घरगुती उपाय

आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनवण्यात केसांचा महत्त्वाचा वाटा असतो. आजकालची खराब जीवनशैली, कामाचा जास्त ताण, प्रदूषणाचा आपल्या आरोग्यावर तसेच केसांवर वाईट परिणाम होतो. आज आपण केस दाट, चमकदार आणि मजबूत कसे करायचे हे जाणून घेणार आहोत.

पोषक तत्वांची कमतरता असलेल्या आहाराचे सेवन केल्याने आपल्या शरीराला पुरेश्या प्रमाणात प्रोटीन, आयरन, कैल्शियम जिंक, आणि विटामिन मिळत नाही आणि हार्मोनल असंतुलन होऊन आपले केस गळू लागतात.

हार्मोन्स असंतुलनामुळे होणारी केस गळती थांबवण्यासाठी आपल्याला नियमितपणे पोषक आहाराचे सेवन केले पाहिजे. आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, अक्रोड, बदाम, तीळ यांचा समावेश करा. या बरोबरच जेवणाच्या वेळा पाळाव्या लागतील. जेवणाच्या वेळेमध्ये 4 तासांचे अंतर असले पाहिजे. दिवसभरात पुरेसे पाणी प्यायले पाहिजे.

रात्री पुरेशी झोप घेतली पाहिजे, मानसीक तणाव कमी करण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी अर्धा तास बाहेर मोकळ्या हवेत चालायला गेल पाहिजे. जमेल तितके खुश आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. रोज थोडासा व्यायाम, योगा, ध्यानधारणा करायची सवय लावा.

केस गळणे थांबवण्यासाठी केमिकल असणारे शाम्पू वापरणे थांबवा, नैसर्गिक घटक असलेले बरेचशे शाम्पू बाजारात उपलब्ध आहेत त्यांचा वापर करा.

केस धुण्यासाठी रिठा, शिकेकाई अशा नैसर्गिक गोष्टींचा वापर करा. शाम्पूने केस सारखे सारखे धुतले तर केस कोरडे होऊन जास्त प्रमाणात गळू लागतात. केस मजबूत होण्यासाठी केस धुण्या आधी केसांची नारळाच्या अथवा बदामाच्या तेलाने मालिश करा.

केस गळणे थांबवण्यासाठी कांद्याचा रस केसांच्या मुळाशी अर्धा तास लावून ठेवा. नंतर शाम्पूने केस धुऊन टाका. असे केल्याने केस गळणे कमी होईल.

केसांना पोषण मिळण्यासाठी आठवड्यातून एकदा केसांच्या मुळाशी अंड्याचा पांढरा बलक लावा. अर्धा तास राहू द्या नंतर कोमट पाण्याने केस धुऊन टाका.

आपल्याला हार्मोनल असंतुलनामुळे होणाऱ्या केस गळतीवर उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी हे फेसबुक पेज लाईक/फॉलो करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page