केस गळणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय

आपले केस लांब, दाट, काळेभोर चमकदार असावे अस प्रत्येक स्त्रीला वाटत असत; मात्र आपल्या शरीरातील हार्मोन बदल, बोरींगच्या क्षारयुक्त पाण्याने केस धुतल्याने, केस धुण्यासाठी केमिकलयुक्त शाम्पू वापरल्याने.

वातावरणातील धूळ, प्रदूषण, रात्री पुरेशी झोप न घेतल्याने, दिवसभरात पुरेसे पाणी न प्यायल्याने, केसांची पुरेशी काळजी न घेतल्याने, मानसीक ताण तणाव, आहारात पोष्टिक अन्न पदार्थांच्या अभावाने केस गळायला लागतात.

केस गळणे थांबवण्यासाठी आपण कांद्याच्या रसाचा वापर करू शकता. कांद्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात जे आपल्या केस गळण्याच्या समस्येवर मात करण्यास मदत करतात. कांद्यामध्ये एन्टी – इंफ्लेमेटरी आणि एन्टी – एलर्जिक, एन्टी – ऑक्सिडंट आणि अँटीमाइक्रोबियल घटक असतात.

केस गळणे थांबवण्यासाठी कांद्याचा रस थेट टाळूवर आणि केसांच्या मुळाशी लावा. साधारणपणे आठ दिवस हा उपाय केल्याने आपल्याला फरक दिसून येईल.

आपले केस गळत नसतील तरी आपण हा उपाय करू शकता कांद्याच्या रसाने केसांना पोषण मिळते ज्यामुळे आपले केस मजबूत होण्यास मदत होते. केस गळणे कमी होण्यासाठी आवळ्याचा रस आपल्या केसांच्या मुळाशी लावा. आवळ्यामधील पोषक घटकामुळे केस मजबूत होतात.

आपले केस गळण्याबरोबरच केसांमध्ये कोंडा झालेला असल्यास आपण केसांच्या मुळाशी मेथीदाण्यांची पेस्ट लावा. 30 मिनिटे राहूद्या नंतर केस धुऊन टाका. मेथी दाण्यांमध्ये असणाऱ्या प्रोटीनमुळे केसांना मजबूती मिळते.

मेथी दाण्यांची पेस्ट केसांना लावल्याने  केस चमकदार होतात. केसांमधील कोंडा कमी होतो. केस धुण्यासाठी शिकेकाई, रिठा अशा नैसर्गिक गोष्टींचा वापर केल्याने केस मजबूत होतात.

केस धुण्याआधी केसांना नारळाच्या तेलाने मालिश केल्याने केस मजबूत होतात; नारळाच्या तेलामध्ये कढीपत्याची पाने टाकून तेल गरम करून घ्या नंतर थंड होऊद्या असे तेल केसांना लावल्याने केस काळे आणि मजबूत होतात.

आपले केस गळू नये यासाठी आपण आपल्या आहारात बदाम या सुक्या मेव्याचा समावेश करा बदामामध्ये असणाऱ्या विटामिन ई ह्या पोषक घटकामुळे केस मजबूत होतात. रात्री पुरेशी झोप घेतल्याने देखील केस गळणे कमी होते.

आपल्याला केस गळणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही तुम्ही केलेल्या कमेंटस वाचत असतो त्यामुळे कमेंट नक्की करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page